लाखाचे सव्वा दोन लाख व्याज घेणाऱ्या सावकाराची मस्ती उतरली, पोलिसांकडे गेली तक्रार आणि…

अहमदनगर । राज्यात अनेक ठिकाणी खाजगी सावकारीची अनेक प्रकरणे सध्या उघडकीस येत आहेत. यामध्ये वाटेल तेवढी रक्कम काढायची हा त्यांचा नित्यनेम. मनाप्रमाणे व्याजाचे दर ठरवून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसुल करायची. यामुळे पैसे घेणाऱ्यांची पूरती दैना उडते.
अशीच एक घटना राशीन येथे घडली आहे. राशीन येथील किराणा दुकानदाराकडून तक्रारदार विजय निंभोरे, रा.राशीन यांनी सन २०१४ साली ५% व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते. मात्र त्याच्या व्याजाचे पैसे एवढे झाले की त्यांना एकच धक्का बसला.
त्यांनी चेक देखील घेतला होता. तक्रारदाराने प्रतीमहिना ५००० रु. प्रमाणे २ लाख ३० हजार एवढी रक्कम दिली. मात्र तरीही सावकारांनी ऑगस्ट २०१८ साली घेतलेल्या धनादेशावर ३ लाख रुपये टाकून धनादेश वटवला होता. खात्यात रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाला. त्यावरून सावकाराने कोर्टात चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला.
ही केस आतापर्यंत न्यायालयात सुरू होती. मात्र तक्रारदार निंभोरे यांनी कर्जत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. आणि मग सावकाराची हवाच निघाली. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या अगोदर अशा प्रकारची अनेक प्रकरणे हाताळली होती.
तसेच त्यांनी पुढे कोणी असे केले तर त्यांना इशारा दिला होता. यामुळे तक्रारदार पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले असता आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार या धास्तीपोटी संबंधित खटला न्यायालयातून मिटवून घेतला. आणि प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
सध्या पोलिसांच्या धास्तीने अनेक प्रकरणे आपापसात मिटवून घेतली जात आहेत. तक्रारदार कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे यामुळे आभार मानले. यामुळे अशी काही प्रकरणे असतील तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ताज्या बातम्या
१५ दिवसात १ कोटी ५ हजार देत माफी मागा, नाहीतर…; निलेश लंकेंनी मनसे पदाधिकाऱ्याला दिला इशारा
सुनेवर थुंकल्याचा शिवसेना नेत्याचा व्हिडीओ, भाजपने घरगुती वादाचा फायदा घेऊ नये; सेना नेत्याची विनंती
…म्हणून सलमानच्या राधेमध्ये छोटीशी भुमिका साकारली; चाहत्यांच्या टिकेनंतर प्रविण तरडेंचा खुलासा
0 Comments: