तारक मेहतातील कलाकारांचा वाद चव्हाट्यावर, सोशल मिडीयावर केले एकमेकांना अनफॉलो

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका सगळ्यात लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेचे अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ही मालिका कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन सतत चर्चेत असते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सर्वच कलाकार मुरलेले आहेत त्यामुळे त्यांचा अभिनय अतिशय योग्य रित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. तसेच या मालिकेची टीम खूप मोठी असून या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.
या मालिकेतील दयाबेन आणि जेठालाल सगळ्यांनाच खूप आवडतात. दयाबेंची भूमिका दिशा वाकानी साकारत होत्या. तसेच जेथालालच्या भूमिकेत आपल्याला दिलीप जोशी पाहायला मिळत आहे. दिलीप जोशींनी या मालिकेच्या आधी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं पाहील. परंतु जेठालाल या भूमिकेमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली.
तारक मेहता… मालिकेतील अनेक कलाकार चर्चेचा विषय ठरलेले आहेत. तसेच या मालिकेमध्ये एकमेकांमध्ये खूप प्रेम असेलेले किवा सर्वजण एकाच परिवाराचा भाग असलेले पाहायला मिळतात. परंतु आता एक नवीनच गोष्ट समोर आली. या मालिकेतील कलाकारांमध्ये कुरघोडी होताना दिसतायेत.
मालिकेत जेथालालच्या मुलाच्या म्हणजेच टप्पूच्या भूमिकेत आपल्याला राज अंदकतला पाहायला मिळत आहे. मालिकेत वडील आणि मुलामध्ये खूप चांगले नाते दाखवण्यात आले आहे. पण खऱ्याआयुष्यात दिलीप जोशी आणि राज यांच्यात आजिबात पटत नसल्याचे समजत आहे.
राज अनेक वेळा सेटवर उशिरा येतो. तसेच त्याचे स्क्रिप्ट तो योग्यप्रकारे पाठ करत नाही. त्यामुळे शुटींग करण्यास विलंब होतो आणि याचाच त्रास दिलीप जोशी यांना होत असल्याचे समजते. यांचा वाद इतका विकोपाला गेला आहे की दोघांनीही एकमेकांना सोशल मिडिया अकाऊंटवरून अनफॉलो केल आहे.
हे ही वाचा-
अजितदादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल
मुंबईतील हॉटेलवर महापौरांनी टाकली धाड; हॉटेलने लसींसोबत आराम करण्याची दिली होती ऑफर
कोरोनावर सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या 2DG औषधाची किंमत ठरली, जाणून घ्या..
0 Comments: