किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे; आई बाबांना भेटू..

रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा यांचा आज जन्मदिन. लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत. तीच होती त्यांची खरी ओळख. लोकांच्या प्रेमापोटी ते आबाच राहिले. त्यांनी कधी आपला आबासाहेब होऊन दिला नाही.
हे त्यांचं वेगळेपण होतं. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा मोठा पल्ला गाठूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते.
आबांचे आपल्या कार्यकर्त्यांवर खूप प्रेम होते. मग तो कोणीही असो. आबांनी कधी कोणाला निराश केले नाही. जो पण त्यांच्याकडे जायचा ते म्हणायचे, आधी चहा घ्या, पोहे खा आणि मग तुमची समस्या सांगा. एवढी सेक्युरिटी घेऊन फिरणारे आबा पण कोणताही कार्यकर्ता आला तरी ते त्याच्याशी खांद्यावर हात टाकून बोलायचे त्याला जवळ घ्यायचे.
असाच एक किस्सा आबांच्या ड्रायव्हर बरोबर घडला होता. एकदा आबा बीडला कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपला आणि आबा गाडीत बसले. आता आबांचा ड्रायव्हर हा मूळचा बीडचा हे आबांना माहीत होते. आबांनी त्याला विचारलं तुझं घर कुठे आहे रे ?
ड्रायव्हर म्हणाला, आबा इथून अजून दीड ते दोन किलोमीटर लांब माझे घर आहे. आबा म्हणाले, घरी कोण कोण असतं ? ड्रायव्हर म्हणाला, आई वडील असतात. पुढे आबा म्हणाले, गाडी तुझ्या घरी घे.
ड्रायव्हरला विश्वास बसेना आबा असे म्हणाले. त्याने गाडी त्याच्या घरी घेतली. इतका मोठा गाड्यांचा ताफा घेऊन आबा त्याच्या घरी पोहोचले. आबांनी सगळ्यांना बाहेरच थांबवले. ड्रायव्हर आणि आबा घरात गेले.
आबा त्याच्या आई वडिलांना भेटले. त्यांच्यासोबत चहा वगैरे पिला आणि म्हणाले, तुमच्या मुलाची काहीही काळजी करू नका. तो माझ्यासोबत एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यांची भेट घेऊन आबा पुढे निघाले.
हा किस्सा सांगताना त्यांचा ड्रायव्हर भावूक झाला होता. तो सांगत होता, माझ्या आई वडिलांनी तर माझ्यावर प्रेम केलंच पण त्यापेक्षाही जास्त प्रेम आबांनी माझ्यावर केलं. त्यांनी कधीही मला वाईट वागणूक दिली नाही.
आबांची एक सवय होती की ते खिडकी खाली करून गाडीत बसायचे. एकदा पाऊस येत होता तेव्हा आबांनी खिडकी खाली केली आणि पावसाच्या सरी आपल्या हातावर घेतल्या. त्या सरींचा आनंद ते घेत होते. नाहीतर असा कोणता मंत्री खिडकी खाली करून एक हात खिडकीच्या बाहेर काढून बसलेला तुम्ही पहिला आहे का ?
महत्वाच्या बातम्या
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
महागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल
रुग्णालयातच परीक्षेची तयारी करतोय कोरोना रूग्ण, त्याच्या जिद्दीचे कलेक्टरनेही केले कौतूक; म्हणाले.. या गावाची राज्यात चर्चा! गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा ग्रामपंचायतीचा निर्णय
0 Comments: