पृथ्वी शाॅने पहील्याच षटकात सहाच्या सहा बाॅलवर चौकार मारत रचला विक्रम; ८२ धावांची तुफानी खेळी

आयपीएलच्या कालच्या सामन्यात पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पृथ्वीने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८२ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाताचा ७ विकेट राखून पराभव केला.
या सामन्यात कोलकाताने दिल्लीपुढे विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पृथ्वीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने शिवम मावीने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार मारले. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले.
त्याला सलामीचा साथीदार शिखर धवनची चांगली साथ लाभली. अखेर या दोघांना, तसेच कर्णधार रिषभ पंतला पॅट कमिन्सने बाद केले. दिल्लीने २१ चेंडू शिल्लक असतानाच हा सामना जिंकला.
कोलकाताने २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर शुभमन गिलने संयमाने फलंदाजी करताना ३८ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले.
अखेरच्या षटकांत आंद्रे रसेलने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्याने कोलकाताला १५० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. सध्या आयपीएल चांगली रंगात आली आली.
अजून अनेक मॅच राहिल्या असल्या तरी ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जगभरात ही स्पर्धा बघितली जाते. मात्र कोरोनामुळे अनेकांनी यातून माघार घेतली आहे.
ताज्या बातम्या
क्रिकेटचा देव पावला! मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडूलकरने केली १ कोटी रुपयांची मदत
शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ
“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”
0 Comments: