बुधवार पेठेतील महिलांसाठी ही तरुणी ठरलीय देवदुत; करतेय असं काम की तुम्हीही म्हणाल वा!

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने कहर घातला आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभरात निर्बंध लावण्यात आले आहे. मागील जवळपास १५ दिवसांपासून पुण्यातही कडक निर्बंध असून सर्व काही व्यवहार थांबलेले आहे.
सर्व काही बंद असल्याने या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये पुण्यातील बुधवार पेठेच्या महिलांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत अनेक लोक माणूसकी खातीर पुढे येऊन या महिलांना मदत करत आहे.
आता अशाचप्रकारे एक ब्रिटिश महिला या महिलांच्या मदतीला धावून आली आहे. आकांक्षा सडेकर या तरुणीचे नाव आहे. तिचा जन्म मुंबईचा असला तरी ती लहानाची मोठी स्कॉटलंडमध्ये झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती भारतातच राहत आहे.
जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने जेवणाचे हाल होत असल्याचे ट्विट केले होते. तेव्हापासून तिने गरजू लोकांना जेवणाचे डब्बे पुरवण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला आकांक्षा एकटीच होती, पण त्यानंतर तिने सोशल मीडियार हे टाकल्यानंतर काही तरुण तरूणी तिच्या मदतीसाठी पुढे आले. आता पर्यंत तिने सहा गरजूंपर्यंत जेवणाचे डब्बे पोहचवल्याचे सांगितले आहे. हा उपक्रम अजूनही सुरुच असून तिच्या सोबत काम करणाऱ्या किशोर नावाच्या व्यक्तीने अन्नाच्या वाहतुकीची जबाबदारी घेतली आहे.
या काळात सर्वात जास्त गरज बुधवार पेठेतील महिलांना होती. लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास बंदी होती. बुधवार पेठेतील रस्ते ओस पडले होते, त्यामुळे महिलांच्या उपासमार होत होती. हे आमच्या लक्षात येता आम्ही इथे डब्बे पुरवण्यास सुरुवात केली, ही माहिती सोशल मीडियावर टाकताच अने लोकांनीही आम्हाला मदत करण्यास सुरुवात केली आहे, असे आकांशाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल
दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन
अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..
0 Comments: