अरेरे! सुनेला वाचवताना सासूचाही पाण्यात बुडून मृत्यू

मनोज जयस्वाल । सासू-सुनेच्या नात्याबद्दल नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. एकमेकींना कमी कसं लेखता येईल याकडंच दोघींचा कल असतो. मात्र, काही सासवा-सुना यास अपवाद असतात. वाशिम जिल्ह्यात अशाच एका प्रेमळ सासूने आपल्या सुनेला वाचवताना स्वत:चा जीव गमावला आहे. वाशिम जिल्ह्यातील कोळी गावात ही घटना घडली आहे. तालुक्यातील कोळी गावात काल दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. काल दुपारच्या सुमारास वीटभट्टीची सर्व कामे आटोपून शीतल बुटके ही महिला तिची सासू जयंताबाई बुडके ह्या दोघी कपडे धुण्यासाठी जवळच असलेल्या तलावावर गेल्या होत्या. तिथं कपडे धूत असतानाच शीतलचा पाय घसरून ती पाण्यात पडली. ती पाण्यात बुडत लक्षात येताच सासूने सुनेचा हात धरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात जयंताबाईचाही पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या. या दोघी बुडत असल्याचे त्यांच्या मुलाला दिसले. त्याने दोघींना वाचविण्याचा प्रयत्न केला. पोहता येत नसल्यामुळे त्याने आरडा ओरड केला, तेव्हा गावातील काही मुलं तिथं आली. त्यांनी पाण्यातून जयंताबाईला बाहेर काढले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तर, शीतलचा शोध लागला नव्हता. वाचा: घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बुडालेल्या शीतलचा मृतदेह काढण्यासाठी कोणीच सापडत नसल्यामुळे गावातील लोकांनी गळ आणून शोध घेतला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: