'एकनाथ खडसेंना 'ईडी'च्या तारखा पाहून करोना होतो, माझं तसं नाही'

जळगाव: मला जो होतो तो ‘ईडी’ च्या तारखा पाहून होत नाही. खडसे यांना ‘ईडी’च्या तारखा पाहूनच करोना होतो. माझे तसे नाही. मला एकदाच करोना झाला अशा शब्दांत भाजप नेते, आमदार यांनी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. महाजन यांना करोना झाल्यानतंर खडसे यांनी इतक्या तरुण व व्यायाम करणाऱ्या नेत्याला करोना कसा झाला? असा प्रश्न उपस्थित केला होता. आज करोनामुक्त झाल्यानंतर जळगावात आलेल्या महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला. ( Targets ) गेल्या दहा दिवसांपासून करोना झाल्याने गिरीश महाजन उपचार घेत होते. त्यांनी नुकत्याच केलेल्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानतंर महाजन यांनी आज जळगावात येऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायात पाहणी करून आरोग्य यंत्रणा व करोना उपाययोजनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाचा: सुरुवातीला एकनाथ खडसे यांना तीन-तीन वेळा करोना कसा होतो? याचे संशोधन झाले पाहिजे असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना डिवचले होते. त्यानतंर महाजन यांना करोना झाल्यानतंर एकनाथ खडसे यांनी टोला हाणला होता. 'गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला करोना खरा आहे का? की, महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा करोना आहे. याचा तपास केला पाहिजे, असं खडसे म्हणाले होते. खडसेंच्या या वक्तव्याचा महाजन यांनी आज समाचार घेतला. वाचा: महाजन म्हणाले की, मला एकदाच करोना झाला. मी दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. माझे चार करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कालचा माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मला जो करोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की लगेच करोना होतो आणि ते खासगी हॉस्पिटलमध्ये जातात किंवा घरीच क्वॉरंटाइन होतात, मुंबईत फिरतात. माझे तसे नाही. मला एकदाच करोना झाला. माझ्या पूर्ण कुटुंबाला झाला. आम्ही सर्व सरकारी दवाखान्यात अॅडमिट होतो. मी असे खोटेनाटे सर्टफिकेट जोडून बॉम्बे हॉस्पिटलला जात नाही. घरी क्वारंटाइन सांगून मुंबईत फिरत नाही, असा टोला महाजन यांनी लगावला. तरुण असो की पहेलवान, सर्वांनाच करोना होत आहे. माझा करोना ईडीचा नाही असल्याचे सांगत महाजन यांनी खडसे यांना चिमटा घेतला. राज्यातील करोना परिस्थिती गंभीर; सरकारचे दुर्लक्ष कोविड रुग्णलयात पाहणी केल्यानंतर गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहेत, त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यात देखील करोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. पण शासनाकडून पुरेशा उपाययोजना नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. करोना बाधित रुग्णांना इथं कुणी विचारायला तयार नाही, बेड्स नाही, व्हेन्टिलेटर नाहीत, ऑक्सिजन बेड्स नाहीत. त्यामुळं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. रेडमेसिवीरचा काळाबाजार आहे, डॉक्टरांचा पगार नाही, आठ ते दहा दिवस रिपोर्ट येत नसल्याने सर्व वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. शासन करते काय? मी आरोग्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही महाजन म्हणाले. वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी बोलतांनाही त्यांनी शासनावर टीका केली. सध्या राज्यात कायद्याचे राज्य शिल्लक नसल्याचे ते म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: