'एनआयएनं राऊतांसारख्या बेताल बडबड करणाऱ्यांची चौकशी करावी'

मुंबई: शिवसेनेसोबत काँग्रेसनं आघाडी करण्यास सुरुवातीपासून विरोध असलेले काँग्रेसचे माजी खासदार यांनी शिवसेनेच्या विरोधात हल्ले सुरूच ठेवले आहेत. आता प्रकरणावरून निरुपम यांनी शिवसेनेचे खासदार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (Sanjay Nirupam Targets ) सचिन वाझे यांची काम करण्याची पद्धत वादग्रस्त आहे. त्यांच्यामुळं सरकार अडचणीत येऊ शकते, असा इशारा मी वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले गेले, तेव्हाच दिला होता. शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना मी हे सांगितलं होतं त्यांची नावं उघड करू इच्छित नाही, असं संजय राऊत काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. वाचा: याच वक्तव्यावरून निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता असं आता संजय राऊत म्हणतात. कालपर्यंत हेच राऊत वाझेंचं समर्थन करत होते. वाझे हे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी असल्याचं म्हणत होते. आता ते काहीही म्हणत असले तरी सचिन वाझे हा कोणाच्या पाठिंब्यानं पुन्हा सेवेत आला हे लोकांसमोर आलेच पाहिजे,' असं निरुपम यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) संजय राऊत यांच्यासारख्या बेताल बडबड करणाऱ्या लोकांना उचलून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि वाझेच्या कर्त्या-करवित्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे,' अशी अपेक्षाही निरुपम यांनी व्यक्त केली आहे. संजय निरुपम हे काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या संकल्पनेला त्यांचा ठाम विरोध होता आणि आहे. विशेषत: त्यांचा विरोध काँग्रेसनं शिवसेनेच्या सोबत जाण्याला होता. महाविकास आघाडी सरकारला दीड वर्षे होऊन गेल्यानंतरही त्याचा हा विरोध आजही कायम आहे. त्यातूनच ते महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: