सत्ता, पदासाठी ही लाचारी; राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार (Narayan Rane) यांनी पुन्हा (CM Uddhav Thackeray) याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावकर () यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिगत सोशल मीडिया अकाउंट्सवरून सावरकर यांना अभिवादन करण्यात आलेले नाही, असे लक्षात आणून देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी?, असा सवाल केला आहे. ही सत्तेसाठी आणि पदासाठी लाचारी असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (bjp mp criticise ) नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @CMOMaharashtra आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरून अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.' क्लिक करा आणि वाचा- भाजप खासदार नारायण राणे हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. अलिकडे राणे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कृपेमुळेच मुख्यमंत्रिपदी बसले आहेत, असे सांगत हे सरकारच शरद पवार यांच्या कृपेमुळे आहे असा हल्लाबोल राणे यांनी केला होता. इतकेच नाही, तर शरद पवार यांची कृपा नसती तर असा मुख्यमंत्री कोणी केला असता?, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. क्लिक करा आणि वाचा- या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यापेक्षा कितीतरी हुशार आहे. सरपंचालाही मुख्यमंत्र्यांपेक्षा कायदे कानून माहीत आहेत, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती घणाघाती हल्ला चढवला. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: