कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

अहमदनगर: कोबीचे भाव पडल्याने तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. सध्या कोबीचे उत्पादन वाढले असून त्याचे भाव मात्र पडले आहेत. आठवडे बाजारात कोबी मोफत वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नफा आणि उत्पादन खर्च मिळणे दूरच कोबी काढून बाजारात नेण्यासाठी खर्च होत असल्याने पीक मोडून काढण्याचा निर्णय घेतल्याचे सुद्रिक यांनी सांगितले. तरीही शहरांत मात्र ग्राहकांना कोबी एवढा स्वस्त मिळत नाही. वाचा: सध्या कोबीचे उत्पादन वाढले आहे. करोनाच्या काळात भाजीपाल्याचे मागणी वाढल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र, प्रत्यक्षात उत्पादनात वाढ होऊन तुलनेत मागणी कमी झाल्याने भाव पडले आहेत. बाहेरच्या शहरांत कोबी पाठविणे परवडत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी घेऊन आले तर त्याला भाव मिळत नाही. आठवडी बाजारात एक ते दोन रुपयाला कोणी कोबीची गड्डा घेत नाही. त्यामुळे बाजारा आणण्याच खर्चही निघत नाही. अशा परिस्थिती पीकच मोडून काढण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. सुद्रिक यांनी अशाच पद्धतीने आपला दोन एक क्षेत्रात ट्रॅक्टर फिरविला. यापूर्वी टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांवर अशी वेळ आल्याची उदाहरणे आहेत, अर्थात सध्याही टोमॅटोला समाधानकारक भाव नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरीही अडचणी आहेत. कर्जत तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पुण्यात जातो. सध्या पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांसह शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. सध्या जो माल जात आहे, त्यालाही समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेती मालाच्या हमी भावासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चे काढले जात आहेत. इकडे मात्र भाव मिळत नसल्याने पिकात ट्रॅक्टर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सर्वच पक्षांनी राजकारण केले असून प्रत्यक्षा प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे भावातील अनिशिततेमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ नेहमीच येते. वाचा:
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: