पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्य सरकारची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करा. सोमवारपर्यंत राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री राठोड यांच्याविरोधात पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप आहे. सर्व पुरावे समोर आलेले असताना सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांच्या पतीविरोधातील एका प्रकरणाची चौकशी पोलिसांनी आता सुरू केली आहे. वाघ या सातत्याने पूजा चव्हाण प्रकरणात सरकारला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या प्रकरणाची आता चौकशी सुरू करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यकत्यांना त्रास दिला म्हणून आम्ही मागे हटणार नाहीत. पक्ष चित्रा वाघ यांच्या पाठीशी आहे, असे पाटील यांनी सांगितले. वाघ यांच्या पतीच्या प्रकरणात काय आर्थिक हेराफेरी झाली असेल तर चौकशी करा, पण दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर सोमवारपासून प्रदेश भाजपच्या युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चाकडूनही आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांची चौकशी करा. चौकशीत काय निष्पन्न झाले ते नागरिकांपुढे येऊ द्या. ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, गर्भपात केलेले डॉक्टर कुठे आहेत, अरुण राठोड कुठे आहे, याची माहिती पुढे येऊ दे, असे पाटील यांनी सांगितले. 'सत्यवादी भूमिका दिसली नाही' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. पण मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत खुर्ची टिकवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्री आणि सत्तारूढ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबद्दल सत्यवादी भूमिका घेतल्याचे दिसले नाही.' मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे हे करुणा शर्मा या विषयावर बोलले. १५ वर्षे संबंध आहेत. पण ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवली. त्यामुळे राठोड यांच्याबरोबर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही विधिमंडळात भाजप करेल, असे पाटील म्हणाले. मंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिले, करोनातील भ्रष्टाचार आदी विषयांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे त्यांनी केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: