राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' इशारा

मुंबईः महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. पण मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर दिशा कायद्यासाठी गठित समितीतून राजीनामे देऊ, असा इशाराच भाजप नेते यांनी दिला आहे. राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं असतानाच यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वाचाः 'पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लिप आहेत. संभाषण आहेत. फोटो आहेत तरीही राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावर राठोड यांना दोष देणार नाही. त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत,' असा आरोपही त्यांनी केला आहे. 'नव्या कायद्यामुळं मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मोकळीक आपण दिली आहे काय. याचे उत्तर आम्हाला हवंय, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. मंत्री संजय राठोड प्रकरणात सारे पुरावे असताना काहीही कारवाई होत नाही. महाराष्ट्र पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधी पाहिली नाही. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास जे अधिकारी करत आहेत त्यांना निलंबित करा, पुरावे असतानाही कारवाई न करणाऱ्या या अधिकाऱ्याला नोकरीवर राहण्याचा काहीच अधिकार नाही,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: