Anna Hazare: तुमच्या मंत्र्यांनी काय केलं होतं सांगू का?; अण्णांनी घेतला शिवसेनेचा समाचार

नगर: शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून ज्येष्ठ समाजसेवक यांच्या स्थगित झालेल्या आंदोलनावर तीरकस भाष्य करण्यात आले आहे. ‘आंदोलने फक्त राजवटीतच करायची काय? बाकी आता अवतरले आहे काय,’ असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. त्याला उत्तर देताना हजारे यांनी म्हटले आहे, ‘मी आंदोलने केली, त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात काय?’ ( Latest News Update ) वाचा: हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. शिवसेनेने अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळायला हवीत,' असे शिवसेनेने म्हटले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा: हजारे म्हणाले, ‘गेल्या चाळीस वर्षांत २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी मोठी अनेक आंदोलने मी केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले आहेत. त्यात , काँग्रेस, व भाजपचेही नेते आहेत. तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालत होतात. तेव्हाही मी आंदोलन केले. त्यावेळी तुमचे हे भ्रष्ट मंत्री घरी गेले हे विसरलात काय? तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कसे पाठिशी घातले. याची मी सर्व माहिती देईन,’ असा इशाराही हजारे यांनी दिला आहे. वाचा: आपल्या आंदोलनाच्या पद्धतीची माहिती देताना हजारे म्हणाले, ‘आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही. आतापर्यंतचा अनुभव पहाता सर्वच पक्षांच्या सरकार विरोधात आपली आंदोलने झाली आहेत. समाज व देशाच्या हितासाठी आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करीत आलो आहोत. दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात २०१४ पासून अनेक वेळा मी पत्रव्यवहार केला. तेव्हापासून या सरकार विरोधात आतापर्यंत आपली सहा आंदोलने झाली आहेत. दिल्लीत वन रँक वन पेन्शनसाठी व भूमी अधिग्रहण बिलाविरोधात तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल - लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथेही २०१९ मध्ये आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय,’ असा सवाल हजारे यांनी शिवसनेला उद्देशून केला आहे. वाचा:
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: