विखे-पाटलांचे आशीर्वाद घ्यायला जाणार-खासदार लंकेंनी दिले संकेत

June 20, 2024 0 Comments

निलेश लंके म्हणाले, निवडणूक झाली आता मी त्यांच्याविरोधात टीका करणे योग्य नाही. झालं गेलं ते सोडून द्यायचे असते, असे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे. तसेच विखे पाटलांचे आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे म्हणत खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी विखे पाटील यांच्या सोबतचे वाद मिटवण्याचे संकेत दिले आहेत.


लहान माणसाने लहान माणसासारखे वागले पाहिजे- खा. लंकेंचे झुकते माप




पुढे खासदार निलेश लंके म्हणले, विखे परिवार हा जिल्ह्यातील मोठा परिवार आहे, त्यांचे सहकारामध्ये मोठे काम आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे योग्य आहे. एखादा शब्द माझा घसरला एखादा त्यांचा गेला असेल पण जिल्ह्यात सहकारामध्ये मोठे नाव आहे. विरोधक आहे म्हणून कायमच विरोधात बोलायचे असं नसतं. माझे एखादे काम असेल तर मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. असे राजकारण पाहिजे. मी त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखे बघायचं त्यांनी माझ्याकडे असे नाही पाहिजे. लहान माणसाने लहान माणसासारखे वागले पाहिजे. मी लवकरच त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. (Nilesh Lanke)



EVM VVPAT वर शंका म्हणजे केंद्रीय यंत्रणेवरच आक्षेप




“डॉ. सुजय विखे यांना अद्यापही पराभव मान्य होत नाही. त्यांनी आता तो स्वीकारला पाहिजे. पण विखे कुटुंबाला तसा इतिहास आहे. पूर्वी यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबीय अशाच पद्धतीने वागले होते. आता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित केली म्हणजे विखे यांनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतला आहे.”


खासदार नीलेश लंके, अहमदनगर


http://dlvr.it/T8XS0h

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: