शिर्डीत उबाठा सेनेची विजयी वाटचाल; भाऊसाहेब वाकचौरेंना 42 हजाराचे मताधिक्य

June 09, 2024 0 Comments

नगर: पुढारी वृत्तसेवा : शिर्डीच्या तिरंगी लढतीत उबाठा सेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब कांबळे यांनी निर्णायक विजयी आघाडी घेतली आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे घटते मताधिक्य पाहता महायुतीला ही जागा गमवावी लागण्याची चिन्हे आहेत. वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी 85 हजारांवर मते घेतल्याने त्याचा फटका लोखंडे यांनाच बसल्याची चित्र दिसू लागले आहे.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत अकोेले विधानसभा मतदारसंघ वगळता इतर संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा येथून लोखंडे यांना मताधिक्य मिळाले होते. शिवसेना फुटीनंतर लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. वाकचौरे यांनी उबाठा सेनेते घरवापसी करत उमेदवारी मिळविली. काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनी बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी मिळविली. त्याचा फटका वाकचौरे यांना बसेल असे वाटत असतानाच प्रत्यक्ष निकालात मात्र लोखंडे यांना त्याचा फटका बसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. पहिल्या फेरीपासूनच उबाठा सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी मताधिक्य घेतले. अखेरच्या फेरीपर्यंत ते टिकून होते. लोखंडे यांना 4 लाख 2 हजार 431 मते मिळाली तर वाकचौरे यांनी 4 लाख 44 हजार 591 मते घेत 42 हजार 160 मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.


महायुतीची पिछाडी




महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ याच लोकसभेतंर्गत येतो. लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. वाकचौरे यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सभा घेतली होती. सलग दोन वेळेस खासदार राहिलेले लोखंडे यांचे घटते मताधिक्य हे महायुतीला चिंतेत टाकणारे आहे.


हेही वाचा



* पुण्यात मुरलीधर मोहोळांची विजयी वाटचाल; कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण

* Baramati Lok Sabha : बारामती मोठ्या साहेबांचीच; सुप्रिया सुळेंची विजयाकडे वाटचाल

* ओडिशात भाजपची वाटचाल सत्ता स्‍थापनेकडे






 


http://dlvr.it/T81S4l

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: