परवाने संपले तरी थाटात उभे होर्डिंग! त्या संस्थांना कोणाचे अभय?

May 17, 2024 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात विविध चौकात व महामार्गावर 384 होर्डिंग आहेत. त्यातील अनेक होर्डिंगची परवानगीची मुदत संपली असून, तरी होर्डिंग थाटात उभे आहेत. मंजूर साईज आणि प्रत्यक्षस्थळावर होर्डिंगची साईज यामध्ये मोठी तफावत आढळून आले. परवानगी संपल्यानंतर होर्डिंग उभे राहत असल्याने त्याचा मलिदा कोण खाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे होर्डिंग उभारणार्‍या संस्थांना महापालिकेने नोटिसा धाडल्या असून, कागदपत्रांमध्ये कमतरता आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई येथे महाकाय होर्डिंग वादळामुळे नागरिकांच्या अंगावर पडून सुमारे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नगर शहरातील अनधिकृत होर्डिंग फ्लेक्स काढण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तर, शहरात नेमके किती अधिकृत होर्डिंग आहेत, त्याचे ऑडिट झाले आहे काय, याच्या पाहणीसाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी पथक धाडले होते. पथकाने पाहणी केली असता अनेक गोष्ठी समोर आल्या. परवानगीची मुदत संपल्यांनतरही होर्डिंग उभे असल्याचे दिसले. तर, परवानगी घेताना होर्डिंगची साईज आणि प्रत्यक्षात उभे असलेल्या होर्डिंगच्या साईजमध्ये मोठी तफावत आढळून आली. तर, अनेक ठिकाणी होर्डिंगसाठी उभारण्यात आलेले लोखंडी सापळे धोकादायक स्थिती आढळून आले. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्तांनी शहरातील होर्डिंग उभारणार्‍या संस्थांना नोटिसा धाडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रात त्रुटी आढळल्यानंतर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, परवानगी संपल्यानंतरही होर्डिंग कोणाच्या आदेशानुसार उभा राहत होत्या, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.


परवानगी संपली तरी होर्डिंग लावणार्‍या संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. धोकादायक ठिकाणची होर्डिंग तत्काळ उतरविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

– डॉ. पंकज जावळे,  आयुक्त





होर्डिंगवर कारवाईसाठी समिती


शहरातील अनधिकृत होर्डिंग, धोकादायक होर्डिंग फ्लेक्स बोर्ड, बॅनर्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. ही येत्या आठ दिवसांत होर्डिंगची पाहणी करून आयुक्तांना अहवाल देणार आहे. अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त सपना वसावा, प्रभारी शहर अभियंता मनोज पारखे, अतिक्रमण विभागप्रमुख आदित्य बल्लाळ, प्रभाग अधिकारी संजय उमाप, राकेश कोतकर, अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जीपीएस समन्वयक शुभम घायाळ.



या संस्थांना नोटिसा


निर्मल क्रिएशन, चाणक्य चौक, फॉर्च्युन अ‍ॅडव्हटायझिंग, शनिशिंगणापूर, मातोश्री एन्टरप्रायजेस, बालिकाश्रम रोड, नगर, सॅन व्हिजन, बस स्टॅन्डसमोर, नगर, नाथकृपा पब्लिसिटी, पाईपलाईन रोड, यशदिप आऊटडोअर्स प्राईम साईड, मिडिया, भुतकरवाडी, नगर, अमेय आऊटडोअर्स, भिस्तबाग चौक नगर, चेंगडिया आऊटडोअर्स प्रा. लि. नगर – पुणे रोड नगर.


मोठे होर्डिंग कोठे





*  नगर-मनमाड रस्ता : पत्रकार चौक, प्रेमदान चौक, बोल्हेगाव पूल, संघर्ष चौक, बोल्हेगाव फाटा, सह्याद्री चौक.

*  नगर-छत्रपती संभाजीनगर रस्ता : डीएसपी चौक, स्टेट बँक चौक

*  पुणे रोड : कोठी चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक, कायनेटीक  चौक, बाह्यवळण चौक, केडगाव परिसर

* कल्याण रोड : नेप्ती, बाह्यवळण चौक परिसर.

* मध्यवर्ती शहर : आयुर्वेद चौक, न्यू आर्ट्स कॉलेज परिसर,  लालटाकी, सर्जेपुरा.

* सावेडी उपनगर : प्रोफेसर  कॉलनी चौक, भिस्तबाग  चौक, श्रीराम चौक,  पाईपलाईन रोड, पारिजात चौक






हेही वाचा



* नगर-शिर्डीसाठी प्रत्येकी 96 टेबल : एकाच वेळी होणार विधानसभानिहाय मतमोजणी

* कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलली

* अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित


http://dlvr.it/T71hcj

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: