देशाचा निकाल ठरला, मोदींच पुन्हा पंतप्रधान : खा. डॉ. सुजय विखे पाटील

April 19, 2024 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारण्याचा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारिजात पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. देशाचा निकाल ठरला असून, नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील, असेही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित शोभायात्रेत पांरपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना खासदार डॉ. विखे पाटील यांनी पाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


खा. विखे पाटील म्हणाले, मागील 10 वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून, हा केवळ ट्रेलर आहे.

पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. येणार्‍या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिकता आहे. येत्या 4 जूनला 400 पारचे ध्येय सहज गाठता येणार आहे. मोदींच्या माध्यमातून 500 वर्षापासून रखडलेलल्या प्रभूरामचंद्राच्या मंदिराची निर्मिती झाली यामुळे देशात हिंदुत्वाला मोठे बळ आले आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढी पाडव्याचा सण हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. रामायण काळात गुढी पाडव्याच्या दिवशी रावणाच्या अत्याचारातून रामाने लोकांना मुक्त केले.


तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता. त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार, दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदूत्वाचा पाया मजबूत होईल, असा आत्मविश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारातून लोकांचा संपर्क वाढविला आहे. यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.


हेही वाचा



* लातूर: उदगीर-निलंगा मार्गावर कार, ट्रकचा भीषण अपघात; ४ ठार

* अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही, आढळरावांनी मात्र जनतेला जपले : अतुल बेनके

* श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोट नगरी फुलली; दंडवत घालून हजारो भक्तांचा संकल्प


http://dlvr.it/T5hzHm

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: