अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा निर्णय-अजित पवार

March 22, 2024 0 Comments

मुंबई: पुढारी वृत्तसेवा; अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्यमंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यामुळे अहमदनगर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रवासियांच्या इच्छेची पूर्तता झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ,दिली आहे. (Cabinet Decision)


पुढे बोलताना ते म्हणाले, या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, आमदार दत्तामामा भरणे, आमदार आशुतोष काळे, आमदार नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मनापासून अभिनंदन करतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. (Cabinet Decision)



अहमदनगर शहराचं नाव ‘अहिल्यानगर’ करण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde जी व राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो.


राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार,…


— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 13, 2024





हे ही वाचा:



* Maharashtra Cabinet Decision | ब्रेकिंग! अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, राज्य सरकारचा निर्णय

* Maharashtra Cabinet Decision | खुशखबर! पोलीस पाटील, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ, राज्य मंत्रिमंडळाचा नििर्णय

* Bharat Jodo Nyay Yatra: ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सभेचे पोस्टर लॉन्च; संविधान लढ्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात ‘न्याय’ गर्जना सभा






The post अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा निर्णय-अजित पवार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T4S3B7

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: