पारनेर : जिल्हा परिषदेकडून 75 सायकलींना मंजुरी : काशिनाथ दाते

March 17, 2024 0 Comments

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अंतर्गत 5 वी ते 10 वीत शिकणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी लेडीज सायकल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील 75 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच विद्यार्थिनींना सायकल वाटप करणार असल्याची माहिती माजी सभापती काशिनाथ दाते यांनी दिली. यामध्ये श्री मलवीर विद्यालय पळशी येथील विद्यार्थिनींना 27, नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडी 11, श्यामजी बाबा विद्यालय गुरेवाडी 15, अशा 53 सायकली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनीना मंजूर झाल्या आहेत. कर्जुले हर्या येथील श्री हरेश्वर विद्यालयास 17, समर्थ विद्यालय पोखरी 5, अशा 22 सायकल महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत मंजूर झाल्या आहेत.


याशिवाय मागील सहा वर्षांत दिव्यांगाना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य, पिठाची गिरणी, अतितीव्र दिव्यांगास औषधोपचारासाठी अर्थसहाय्य, कडबा कुट्टी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, झेरॉक्स मशीन, इलेक्ट्रिक मोटर, जिल्हा परिषद अंतर्गत दुर्धर आजारासाठी दिले जाणारे अर्थसहाय्य, अपंग व्यक्तीने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यास अर्थसहाय्य, अतितीव्र बहुविकलांग अपंग पालकांच्या पाल्यांना अर्थसहाय्य, मतिमंदासाठी औषधोपचार अर्थसहाय्य, बॅटरी संचालित रिक्षा, अशा अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांसाठी सभापती दाते यांनी करून दिला आहे. पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जोत्स्ना मुळीक, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमेश औटी यांचे यासाठी सहकार्य मिळाल्याचे दाते यांनी सांगितले. दाते सर यांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर 600 सायकली मंजूर करून घेतल्या आहेत.


हेही वाचा



* पिंपळनेर : तिघांची राज्य शासनाच्या आरोग्य विभागात निवड

* ‘जलजीवन’च्या कामांनी गाठली निकृष्टतेची पातळी !

* विकासकामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये : आ. अशोक पवार






The post पारनेर : जिल्हा परिषदेकडून 75 सायकलींना मंजुरी : काशिनाथ दाते appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T4BX5t

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: