गळा आवळला अन् गुजरातला पळाला

November 23, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन जाब विचारल्याने पत्नीचा खून करून, मृतदेह पुुरून विल्हेवाट लावल्याच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अहमदाबाद येथून जेरबंद केले. पत्नी वाद घालून नेहमी संशय घेत असल्याने गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे (वय 33, रा. पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. रूपाली ज्ञानदेव आमटे (वय 24) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत रूपालीचा भाऊ रोहित संतोष मडके(रा. फक्राबाद, जामखेड) याने श्रीगोंदे पोलिसांत फिर्याद दिली होती. तीत म्हटले, बहीण मयत रूपाली ज्ञानदेव आमटे हिने पती ज्ञानदेव आमटे याला अनैतिक प्रेम संबंधाबाबत जाब विचारल्याचा राग आला. त्याने बहिणीला कशाने तरी मारहाण करून, जिवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे प्रेत कापडात बांधून घराचे डाव्या बाजूस खड्डा करून पुरले आणि पत्नी रूपाली हरवल्याची खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दिली.


संबंधित बातम्या :



* त्या कैदयाला आई- वडिलांनीच परत कारागृहात केले हजर

* प्रस्तावित कृषी कायद्याविरोधात विक्रेत्यांचा बंद

* श्री शिव महा पुराण कथा उत्सवाच्या गर्दीत चोरट्यांनी मारला हात, 21 तोळे सोने लंपास






त्यानंतर बहिणींचा मृतदेह घराजवळच खड्ड्यात सापडला. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी ज्ञानदेव आमटे पसार होता. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपीच्या शोधासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके आरोपीचा शोध घेत होते.


आरोपी गुजरातला पळाला

आरोपी ज्ञानदेव आमटे गुजरातला पळून गेल्याची माहिती तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने गुजरातच्या दिशेने रवाना झाले. शनिवारी पोलिस पथक गुजरातमध्ये पोचले. आरोपी अमदाबाद येथून असून वेळोवेळी वास्तव्य बदलत असल्याचे समोर आले. अमदाबादमधील हॉटेल, लॉजेस व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले आणि गुन्ह्याची कबुली दिली.


या पथकाने केली कामगिरी

ही कारवाई एलसीबीचे उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस कर्मचारी बबन मखरे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.


The post गळा आवळला अन् गुजरातला पळाला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzBCDl

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: