अमरापूर केंद्रातून 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा

September 10, 2023 0 Comments

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अमरापूर पाणी उपसा केंद्रातून अद्यापही 10 टँकरद्वारे पाथर्डी तालुक्यात सात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. शेवगाव, पाथर्डी प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेसाठी अमरापूरच्या शुद्ध पाणी उपसा केंद्रातून पाथर्डी तालुक्यातील अकोला, भुतेटाकळी, मोहरी, मोहोज देवढे, धामनगाव, मोहटा, पालवेवाडी या सात टंचाईग्रस्त गावांना 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 14 मेपासून येथील दोन गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. हळूहळू इतरही गावांत पाणी टंचाई निर्मान झाल्याने टँकरच्या संख्येत वाढ होत गेली. जवळपास चार महिन्यापासून येथून टँकर सुरू असून, त्यांची 10 हजार, 20 हजार लिटर क्षमता आहे. अकोला, भुतेटाकळी, मोहोज देवढे येथे प्रत्येकी दोन टँकर सुरू आहेत. पावसाळा सुरून होऊन तीन महिने होत आले तरीही जोरदार पाऊस झाला नसल्याने पाथर्डी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. पाथर्डी शहरापासून अमरापूरचे अंतर 12 कि.मी. आहे. येथे शेवगाव पाथर्डी प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे पाणी उपसा केंद्र आहे. दोन लाख 50 हजार लिटर क्षमतेची उंच पाणी टाकी व सहा लाख लिटर क्षमतेची तळटाकी आहे. तळटाकीतून टँकर भरण्यासाठी पूर्वीच केलेल्या व्यवस्थेतून टँकर भरले जात आहेत. हेही वाचा पुण्याच्या कारभारावर आता आरोग्यमंत्र्यांचेही लक्ष राजकीय पक्षांची ‘दुबार’ पेरणी रहस्‍यरंजन : ऐरावतेश्वराच्या पायर्‍यांमधून उमटणारे संगीत The post अमरापूर केंद्रातून 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvtWJz

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: