मध्यान्ह भोजनचे अनुदान जमा करा : अ‍ॅड. शिवाजीराव काकडे

August 06, 2023 0 Comments

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  कामगार विभागाकडे 16 हजार कोटी रुपये आहेत. त्यातील अडीच हजार कोटी मध्यान्ह भोजन योजनेच्या ठेकेदाराला दिले. मात्र, ही योजना फसवी आहे. कामगारांच्या खात्यावर मध्यान्ह भोजनचे अनुदान दर आठवड्याला जमा करावे. त्यांच्या नावे पाच ते दहा लाखांचा विमा उतरवावा. लागू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा त्यांना लाभ द्यावा, अशा विविध मागण्या अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी केल्या. शेवगाव येथे जनशक्ती श्रमिक संघटना आयोजित नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या जन आक्रोश मोर्चा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जगन्नाथ गावडे, संजय दुधाडे, विष्णू दिवटे, दादा दिवटे, नवनाथ खेडकर, कारभारी मरकड, अकबर शेख, भारत लांडे, सुनील गवळी, मीरा गडाख, सत्यभामा जाधव, सुलभा उगले, अलका परदेशी यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात असंघटीत कामगारांच्या कामासाठी संघटन वाढविण्याचे आवाहन काकडे यांनी यावेळी केले. तर, आमंत्रित करूनही कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. काकडे म्हणाले, कामगार माझा श्वास व ध्यास आहे. आपण पदाच्या अपेक्षेने कार्य करत नाही. सत्ता येईल जाईल, मात्र सत्ता भोगणार्‍यांनी फक्त नकला करण्याचा कार्यक्रम केला. नऊ गावांच्या ताजनापूर टप्पा-2च्या पाण्यासाठी क्रांतीदिनी जलसंधारण कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा इशारा अ‍ॅड. काकडे यांनी दिला. तसेच आमची बांधिलकी कामगारांशी आहे. काकडे कुटूंब नेहमी कामगार, कष्टकरी, शेतकर्‍यांसाठी राबते. सध्या गल्लाभरू, पोटभरू, मतभरूंचा सुळसुळाट झाला आहे. जनतेला असली-नकली सारे समजते. कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय राजकारण व संघर्ष आमच्या रूपात कामगारांनी जिवंत ठेवला आहे. जिल्हा परिषदे व्यतिरिक्त कोणतेही मोठे पद मिळाले नाही. तरीही तालुक्यात इतिहास घडविला. आमच्यात मतदार संघ नव्हे, तर राज्य बदलण्याची ताकद आहे. ..तर पूर्ण इस्टेट त्यांच्या नावावर करू संघर्ष करून सहाशे कोटी रूपयांच्या ताजनापूर टप्पा-2 योजनेत अनेक गावे घेतली. कोणीही याबाबत आवाज उठविला नाही. उठविला असेल तर त्यांनी सांगावे. हे खरे झाल्यास मी माझी पूर्ण इस्टेट त्यांच्या नावावर करील, असे आव्हान अ‍ॅड. काकडे यांनी दिले. The post मध्यान्ह भोजनचे अनुदान जमा करा : अ‍ॅड. शिवाजीराव काकडे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StFg1Y

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: