अहमदनगर : जलजीवन योजनेचे ३० लाखाचे पाईप गेले चोरीला

August 05, 2023 0 Comments

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेसाठी आलेल्या पाईपांच्या संरक्षणासाठी ठेकेदार कंपनीने कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नसल्यामुळे या योजनेचे ३० लाख रुपये किमतीचे चोरीला गेले आहेत. हा पाईप वेल्हाळे शिवारातून चोरीला गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळेसह निमगाव भोजापूर व इतर तीन गावांसाठी जल जीवन मिशन योजनेच्याअंतर्गत जल जीवन योजनेचे वेल्हाळे शिवारातील भांड मळा या ठिकाणी चालू आहे. हे काम संगमनेर येथील आर.एम कातोरे अँड कंपनीला देण्यात आलेले आहे. या योजनेसाठी ईलेक्टोस्टील कास्टींग लिमीटेड कंपनीचे ५.५ मिटर लांबीचे तसेच १०० MM DI K7 डायचे, ४ ईची असणारे पाईप १४ जुलै रोजी १८२ पाईप तर २३ जुलै रोजी २८८ असे एकूण ४७० पाईप आले होते. हे सर्व पाईप वेल्हाळे शिवारातील इथापे कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या भांड मळ्यात ठेवण्यात आले होते. तीस लाख रुपये किमतीचे असणाऱ्या जलजीवन योजनेच्या पाईपांची सुरक्षाकर ण्यासाठी ठेकेदार कंपनीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे गरजेचे होते. परंतु या ठेकेदार कंपनीने कुठल्याही सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली नव्हती. मात्र, अधूनमधून या ठेकेदार कंपनीचे अभियंता अंकेत वाकचौरे हे लक्ष ठेवत होते वाकचौरे हे १ ऑगस्टला कामानिमित्ताने भांड मळा या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी जल जीवन योजनेचे पाईप आढळून आले त्या नंतर पुन्हा ते ३ ऑगस्ट रोजी त्याठिकाणी गेले होते. त्यांना त्या ठिकाणी पाईप आढळून आले नाही. त्यानंतर वाकचौरे व ठेके दार कंपनीच्या कामगारांनी परिसराच्या आसपास चोरीला गेलेल्या पायपांचाशोध घेतला असता ते मिळून आले नाही. याबाबत आर. एम. कातोरे अँड कंपनीचे अभियंता अंकेत वाकचौरे यांनी शहर पोलीस साथ दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचलंत का? * Nashik Collector Jalaj Sharma : जिल्हाधिकाऱ्यांनी ४ किमीची पायपीट करत गाठली अतिदुर्गम खैरेवाडी * Tomato Price Hike : टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी शेतात बसविला सीसीटीव्ही कॅमेरा; शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग The post अहमदनगर : जलजीवन योजनेचे ३० लाखाचे पाईप गेले चोरीला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StCnG9

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: