Shirdi: रामनवमीचा वाद पोलीस स्टेशनला | कमलाकर कोते झाले आक्रमक...

March 08, 2023 0 Comments

पहा व्हिडीओ....

 शिर्डी:  साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेली श्रीरामानवमी उत्सवाला मोठी धार्मिक परंपरा आहे. देश विदेशातील अनेक भाविक ह्या उत्सवाला मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. परंतु शिर्डीच्या इतिहासात तब्बल ११२ वर्षानंतर पहिल्यांदा ह्या उत्सवात दोन गट पडले असून एका धार्मिक परंपपरेवर मोठा आघात झाला आहे. वास्तविक शिर्डी गावातील प्रत्तेक रहिवासी हा एक कुटुंबाप्रमाणे शिर्डीत रहात असून कोणत्याही जातीधर्माचा याठिकाणी भेदभाव नाही. आपले घरातील वाद घरात मिटवण्याची प्रथा आहे परंतु आज ह्याच कुटुंबातील दुफळीमुळे अनेक ग्रामस्थांच्या मनाला ठेच पोहचली असून त्याचे पडसाद राज्यात व देशात कसे उमटणार आहे.
 
  ग्रामस्थांच्या बैठकीत संजय अप्पा शिंदे यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. आणि ह्याच बैठकीनंतर मीडिया समोर येत कमलाकर कोते यांच्यावर मागील रामनवमीच्या वर्गणीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले. त्यांनंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या गटाने ग्रामस्थांची पुन्हा बैठक बोलावून  त्यात दीपक वारुळे यांना समितीचे अध्यक्ष नेमले.

  अशात कमलाकर कोतेंनी आता पोलीस स्टेशनला धाव घेतल्यामुळे हा विषय आता आणखीच चिघळणार अशी चिन्हे दिसत आहेत.

व्हिडियो सौजन्य: OS न्यूज, शिर्डी
साभार: वरिष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर, शिर्डी
           वरिष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ, शिर्डी

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: