शिवजयंती निमित्त 'विशेष सेवा शिबीर' - रवींद्र गोंदकर

March 08, 2023 0 Comments

  शिर्डी: शिवजयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात अशाच प्रकारचा उपक्रम श्रीराम प्रतिष्ठान - श्रीरामनगर च्या रवींद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राबवला जातो. 

   ह्या उपक्रमात नागरिकांना कागदपत्र तयार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन एक 'विशेष सेवा शिबीर' राबवले जाते. यात नागरिकांना आधारकार्ड, पण कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, उज्वला गॅस योजना, ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागद पात्रांच्या नोंदणी व दुरुस्तीची सेवा पुरवली जाते.

  दरवर्षी शेकडो नागरिक ह्या सेवेचा लाभ घेतात. ह्या वर्षी ही हे शिबिर श्रीराम प्रतिष्ठान द्वारे आयोजित केले आहे. शिवजयंती निमित्त हे शिबीर राबवले जाणार असल्याने शिबरीरासाठी 10 मार्च ही तारीख ठरवण्यात आली आहे.

  दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा नागरिकांनी सेवांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आव्हान रवींद्र गोंदकर यांनी केले आहे.

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: