शिर्डीच्या 'इशिका कोते' ची गगनभेदी 'शिवगर्जना' होतेय व्हायरल, परंतु शाळेत केला जातोय भेदभाव

February 13, 2023 0 Comments

  

        शिर्डी च्या इशिका अमोल कोते ह्या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा एक व्हडियो खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये इशिका गगनभेदी शिवगर्जना करताना दिसत आहे. 
         इशिका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असली तरी कट्टर मराठा कुटुंबातील असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानूनच ती मोठी होत आहे. अशात तिला चौथीच्या वर्गात पहिल्यांदाच छात्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायला मिळाला आणि तिने शिवगर्जना शिकण्याचे ठरवले. 
        इशिकाने मनापासून जिद्दीने शिवगर्जना पाठ केली व नंतर शाळेमध्ये आपल्या शिक्षिकेला शिवजयंतीच्या दिवशी मला स्टेजवर शिवगर्जना करायची इच्छा आहे असे सांगितले परंतु शाळेत शिक्षिकेने "तुझा आवाज खूप कमी आहे तुला शिवगर्जना करता येणार नाही" असे इशिकला सांगून तिचा हिरमोड केला वर नंतर आपल्या एका सह्प्रध्यापिकेच्या मुलीला शिवगर्जना करण्याची संधी दिली व त्या मुलीची शिवगर्जना पाठांतर नसतानाही पाठांतर करून स्टेजवर यायची संधी मिळवून दिली.
        अशाप्रकारे भेदभाव होताना इशिकाला सहन झाला नाही आणि तिने वडील अमोल कोते यांना सांगितले. त्यावर कोतेंनी ठरवले कि, "शाळेत संधी मिळाली नाही म्हणून काय झालं आपण तुझा एक जबरदस्त व्हिडीओ बनवू आणि तो लोकांपर्यंत पोहोचवू. शाळेतील मुलांना ऐकायला मिळालं नाही म्हणून काय झालं आपण संपूर्ण जगाला ऐकवू".
        आणि मग कोतेंनी तिचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याला सुंदर एडिटिंग ची जोड देऊन तो व्हिडीओ सोशल मिडिया वर प्रसारित केला.


      अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ शिवप्रेमींना खूपच आवडतोय. कित्येकांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकौंट्स वर स्टेटस म्हणून ठेवलाय. आणि खूप प्रमाणात शेयर ही केला जात आहे. 

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: