कानून के हात बहुत लंबे होते हैं..! एकोणपन्नास वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

December 05, 2022 0 Comments

https://ift.tt/Gx8reX0

अमोल कांकरिया : 

पाथर्डी तालुका : ’कानून के हात बहुत लंबे होते है’ हा डायलॉग आपल्याला अनेकदा हिंदी सिनेमातून ऐकायला मिळतो. तसाच काहीसा प्रकार या डायलॉगप्रमाणे खर्‍या आयुष्यात घडला आहे. ते म्हणजे असं की, तब्बल एकोणपन्नास वर्षांनंतर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पाथर्डी पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले आहे. पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवराम उर्फ सीताराम तात्याबा भताने (वय 77) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील सरदार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन 1973 साली भादंवि कलम 302, 382 अन्वये चोरी करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांना यातील आरोपीचे नाव सीताराम तात्याबा भताने (रा. रांजणी, ता.पाथर्डी, जि. नगर) असे असल्याचे निष्पन्न झाले होते.

गुन्हा घडल्यापासून तो गुजरात पोलिसांच्या हाती आला नव्हता. आरोपी भताने याने आपल्या मूळ गावी रांजणी येथे येऊन आपले मूळ नाव सिताराम हे बदलून शिवराम केले. गुजरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरूच होता. वेळोवेळी गुजरात पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडे यासंदर्भात माहिती घेतली. पण, हा आरोपी मिळून येत नव्हता.

मात्र, ’कानून के हात बहुत लंबे होते है’ या वाक्याप्रमाणे पोलिसांनी अखेर 49 वर्षांपूर्वी गुन्हा घडलेल्या आरोपीला शनिवारी शोधून काढत जेरबंद केले. पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस नाईक राम सोनवणे, अतुल शेळके, भारत अंगरखे यांनी ही कारवाई केली.

नाव बदलून राहत होता भताने

आरोपी भताने हा वेगवेगळी नावे बदलून राहत होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांनी अहमदनगर पोलिसांना भताने याचा शोध घेऊन ताब्यात देण्याची मागणी केली होती. पाथर्डी पोलिसांनी भताने याचा आठ दिवस कसून शोध घेत, त्याला ताब्यात घेतले. अखेर एकोणपन्नास वर्षांनंतर आरोपी जेरबंद झाला.

गुजरात पोलिसांच्या ताब्यात देणार

आरोपी भताने हा लाकडी काठीचा आधार घेऊन चालत होता. तसेच, तो हा गुन्हा लपविण्यासाठी कीर्तन, भजन अशा कार्यक्रमात सहभागी होत असे. वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. पाथर्डी पोलिस आरोपी भताने याला गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करणार असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

The post कानून के हात बहुत लंबे होते हैं..! एकोणपन्नास वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/xcOoet4
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: