नगर : ‘जलजीवन’ महत्त्वाकांक्षी योजना : माजी मंत्री शिवाजी कर्डिले

November 08, 2022 0 Comments

https://ift.tt/TFjVgJR

नगर; पुढारी वृत्तसेवा : गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरून त्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेली जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.

जलजीवन मिशनअंतर्गत एमआयडीसी ते अरणगाव येथे 15 कोटी 59 लाख 78 हजार 450 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन किसनराव लोटके, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, मेहेरनाथ कलचुरी, आनंदा शेळके, सरपंच स्वाती गहिले, उपसरपंच नंदा करांडे आदींसह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, शहरापासून अरणगाव जवळ असूनही, पाण्याअभावी विकास खुंटला आहे. आता लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे गावचा विकास होईल. खा. सुजय विखे व आ. नीलेश लंके यांचेही योजना आणण्यासाठी मोठे सहकार्य लाभले. ग्रामस्थांनी शंभर टक्के पाणीपट्टी भरून सहकार्य करावे. प्रास्ताविकात बबन करांडे यांनी योजनेची माहिती दिली. राजेंद्र दळवी, महेश पवार, सरपंच स्वाती गहिले, मनीषा गहिले, आनंदा शेळके, किसनराव लोटके यांनीही मनोगत व्यक्त केले.

The post नगर : ‘जलजीवन’ महत्त्वाकांक्षी योजना : माजी मंत्री शिवाजी कर्डिले appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/mYvAnjL
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: