गौण खनिज उत्खनन करणार्‍यावर कारवाई ; कुंभेफळ शिवारात भरारी पथकाचा छापा

November 11, 2022 0 Comments

https://ift.tt/RINSDA9

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील कुंभेफळ शिवारात महसूलच्या भरारी पथकाने अवैद्य गौण खनिज दगड उत्खनन व वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई केली. तालुक्यातील कुंभेफळ शिवारात 8 नोव्हेंबरला रात्री उपविभागीय अधिकार्‍यांच्या पथकाने दगडाची बेकायदा उत्खनन करणारा एक पोकलेन व दगड वाहतूक करणारा एक डंपर जप्त केला. जप्त केलेले वाहन एस. पी. देवकर यांचे असल्याचे प्रशासनाने काल पत्रकारांना सांगितले. तालुक्यातील सर्व खडी क्रशर महसूलने बंद केले आहेत.

आठ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील कुंभेफळ शिवारात दगडाचे बेकायदा उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना समजली. यानंतर त्यांनी भरारी पथके तयार केली. पथकाने छापा टाकला असता, त्यांना कुंभेफळ येथे संजय धोदाड यांच्या मालकीच्या शेतात अवैद्य दगड उत्खनन पोकलेनच्या साह्याने सुरू असल्याचे व उत्खनन केलेले दगड एका डंपरमध्ये भरण्यात येत असल्याचे आढळले. भरारी पथकाने ते पोकलेन व डंपर जप्त केले. यानंतर अटी व शर्तीवर संबंधित मालकाला पोकलेन ताब्यात देण्यात आले. मात्र, मोठे दगड भरलेला डंपर कर्जत तहसील कार्यालयात आणला आहे.

यानंतर या पथकाने देशमुखवाडी व डोंबाळवाडी येथील क्रशर आणि खदानी यांची देखील तपासणी केली. त्या ठिकाणचे खडी क्रेशर बंद आढळून आले असून, ताब्यात घेतलेल्या वाहनांवर तहसील कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने खडी क्रशर आहेत. सध्या हे सर्व क्रशर बंद आहेत. तात्पुरती परवानगी मिळावी, यासाठी सर्वांनी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे व घरगुती बांधकामे सुरू आहे. क्रशर बंद राहिल्यामुळे ही सर्व कामे ठप्प झाले आहेत. यामुळे त्याचा विकासावर गंभीर परिणाम झाला आहे. या सर्व खडी क्रशर चालकांना तात्पुरती परवानगी द्यावी अशी मागणी आहे.

The post गौण खनिज उत्खनन करणार्‍यावर कारवाई ; कुंभेफळ शिवारात भरारी पथकाचा छापा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WFmxgJX
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: