जिल्ह्यात अंबालिका कारखान्याचे सर्वाधिक गाळ ; दहा कारखान्यांचे गाळप सुरू

November 12, 2022 0 Comments

https://ift.tt/S1t53mg

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन वर्षापासून वरुणराजाने शेतकरी वर्गावर मेहेरनजर केली आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रात वाढ होऊन शेतकर्‍यांना प्रती एकरी उसाची उत्पादकताही वाढली आहे. त्यामुळे मागील हंगामाबरोबरच याही हंगामात अहमदनगर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असून येथील 22 साखर कारखान्यांपैकी 10 कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहे. त्यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत 7 लाख 16 हजार 108 मे. टन उसाचे गाळप करून त्यापासून 5 लाख 26 हजार 675 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे तर दैनंदिन साखर उतारा 8.73 असा आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप मे. टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे.

अंबालिकाः (2 लाख 2 हजार 970 मे. टन) (1 लाख 65 हजार 600 साखर पोते), (9.43 साखर उतारा), सहकारमहर्षी थोरातः (88,930) (68, 350). (8.95). मारुतराव घुले ज्ञानेश्वर (86,130) (63,350), मुळा (72.690) (42, 500), सहकारमहर्षि नागवडे श्रीगोंदा (64,810) (44,900) (8.30), पदमश्री विखे पाटील (53,200) (33,450), (8.25), कुकडी (42,950) (30,450), (8.10), वृध्देश्वर (41.835) (32,200), अशोकनगर (41,350) (32,350), (9.39), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (21,243) (13,225) याप्रमाणे गळीत झाले आहे.
राज्यात 56 सहकारी व 56 खासगी कारखान्यांनी 35 लाख 16 हजार मे. टन उसाचे गाळप करून त्यापासून 25 लाख 26 हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी 7.18 साखर उतारा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील साखर कारखानदारीला इथेनॉलचा बुस्टर डोस दिला आहे. चालू गळीत हंगामात इथेनॉल दरात दीड ते दोन रूपयांची वाढ केली आहे. देशात 218 इथेनॉल प्रकल्पांना 17 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय करण्यात आले आहे. भूमंडलीय वैष्मीकीकरण अंतर्गत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी निती आयोगाने चालू हंगामात पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी दिली आहे. त्यातून देशाचे 30 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन वाचणार आहे. नव्याने 80 इथेनॉल प्रकल्प उभारणीस परवानगी देण्यात आली आहे.

सहकार क्षेत्रासमोर खासगी कारखान्यांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आधुनिकीकरण केल्याशिवाय सहकाराला पुढे जाता येणार नाही. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत सहकारी साखर कारखानदारीला यशस्वी व्हायचे असेल तर सहवीज, इथेनॉल, बायोगॅस निर्माती आसवनी व त्यावर अवलंबून असणारे उपपदार्थ रासायनिक, औषधी पदार्थ याचा आधार घ्यावा लागेल व दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ करून कमी दिवसात जास्तीचे गाळप कसे होईल, हा पर्याय निवडाला लागणार आहे.

एक रक्कमी एफआरपीमुळे बहुतेक ठिकाणी शेतकरी भूसार पिकाऐवजी ऊस पिकाकडे वळाला आहे. मात्र मागील वर्षी अतिरिक्त उस झाल्यामुळे त्यांच्या शेतातील उसाला उशीरा तोडी मिळाल्या त्याचा फटका भावात बसला. तेव्हा यावर्षी तसे होऊ नये म्हणून शेतकरी व साखर कारखानदार दोघेही काळजी घेत आहे. ऊस तोडणी कामगारावर अवलंबून न राहता यांत्रिक तोडणीवर भर दिला जात आहे.
मात्र, ऑक्टोबरमध्ये जास्तीचा परतीचा पाउस झाल्याने यांत्रीक तोडणीच्या नियोजनावर निसर्गाने वरवंटा फिरविला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

60 लाख टन साखर निर्मिेतीस परवानगी

मागील हंगामात ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्याने भारत देशात जगात पहिल्या क्रमांकाचे साखर उत्पादन झाले होते. याही वर्षी सर्वाधिक साखर उत्पादन लक्षात घेता केंद्र शासनाने 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे.

The post जिल्ह्यात अंबालिका कारखान्याचे सर्वाधिक गाळ ; दहा कारखान्यांचे गाळप सुरू appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/LnoRB8Y
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: