नगर : संगमनेर पोलिसांकडून २३ लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

November 06, 2022 0 Comments

https://ift.tt/PHMev0Q
Nagar

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर पोलिसांनी शनिवारी (दि. ५) रात्री २३ लाख ८५ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. १७२ किलो गांजासह कार, दोन मोबाइल असा मुद्देमाल हस्‍तगत केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,  दोघांना अटक करण्यात आली आहे. संदीप लक्ष्मण भोसले (वय ३५, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय ३०, रा. वडगाव सावताळ, ता. पार नेर, जि. अ.नगर) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. संगमनेर-लोणी रस्त्यावरील समनापूर शिवारात सापळा रचून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. (Nagar)

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर ते लोणी मार्गावरुन जाणाऱ्या एका कारमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना मिळाली. संगमनेर ते लोणी रोडवरील समनापुरमध्ये पोलीस साध्या वेशात या तस्करीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान लोणी कडून संगमनेरच्या दिशेने एका कारच्या (क्र. एम. एच ५० एल ९९७०) चालकास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. त्याने कार थांबविली असता पोलीस पथकाने संबंधित चालकाची आणि सोबतच्या साथीदाराची चौकशी केली. (Nagar)

पोलिसांनी संबंधित कारची झडती घेतली असता त्यामध्ये संशयास्पद १७ पाकिटे आढळून आली. याची तपासणी करण्‍यात आली असता त्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने याबाबत संबंधित दोघांना कारसह ताब्यात घेतले. १५ लाख ५५ हजार ७४० रुपये किमतीच्या १७२ किलो वजनाच्या गांजाच्या पुड्या, ८१ हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची ब्रीझा कंपनीची कार, २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीच्या काळ्या रंगाचे २ मोबाईल असा एकूण २३ लाख ८५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत अण्णासाहेब दातीर यांनी संगमनेर शहर पोलिसात दिली. या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी संदीप भोसले व बाळासाहेब शिंदे या दोघांच्या विरोधात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

पोलीस पथकातील पोलीस नाईक दातीर, पोलीस कॉस्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक अनिल कडलग, श्याम हासे, बापूसाहेब हांडे, सायबर सेलचे फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाबासाहेब खेडकर, पोलीस कॉस्टेबल अनिल उगले, पोलीस हेड कॉस्टेबल मनोज पाटील, अमित महा जन, पोलीस नाईक विजय पवार, कानि फनाथ जाधव, साईनाथ पवार आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा

The post नगर : संगमनेर पोलिसांकडून २३ लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/7voPLJa
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: