जामखेड : ‘त्या’ 58 गावांना मिळणार पोलिस पाटील ; प्रशासनाकडून हालचाली

November 07, 2022 0 Comments

https://ift.tt/vhm8j2e

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत-जामखेड या तालुक्यात नवीन तयार झालेल्या महसूली गावाला पोलिस पाटील हे पद अस्तित्वात नाही. सद्यस्थितीत कर्जत तालुक्यातील 118 गावांपैकी 78 गावांत पोलिस पाटील पद हे मंजूर आहे. तर जामखेड तालुक्यात 87 गावांपैकी 52 गावात पोलिस पाटील पद हे मंजूर आहे. त्यानुसार कर्जतला 33 पोलिस पाटील तर जामखेडला 25 पदे भरणार आहेत. कर्जत तालुक्यातील 118 गावापैकी नगरपंचायत हद्दीतील चार गावे तसेच पोलिस स्टेशन 3, कर्जत, मिरजगाव, आणि राशीन येथे पोलिस चौकी अशी एकूण 7 गावे वगळता उर्वरित एकूण 111 गावांमध्ये पोलिस पाटील पदे आवश्यक आहेत. परंतु पूर्वीचे 78 पदे अस्तित्वात असून नव्याने 33 महसुली गावांना पोलिस पाटील पदनिर्मिती करावयाची आहे.

जामखेड तालुक्यातील 87 गावापैकी नगरपंचायत हद्दीतील सात गावे तसेच पोलिस स्टेशन हद्दीतील तीन, जामखेड, खर्डा, आणि नान्नज येथे पोलिस चौकी अशी एकूण 10 गावे वगळता उर्वरित एकूण 77 गावामध्ये पोलिस पाटील पदे आवश्यक आहेत. परंतु पूर्वीचे 52 पदे अस्तित्वात असून नव्याने 25 नवीन महसूली गावांना पोलिस पाटील पदनिर्मिती केली आहे.

कर्जत तालुक्यातील 33 महसुली गावांना पोलिस पाटील नाही, तर जामखेड तालुक्यातील 25 महसुली गावांना पोलिस पाटील पद निर्मिती नाही. त्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील पूर्वीच्या वाडीचे आता नवीन महसूल गावांत रूपांतरीत झाली असल्यामुळे सदरच्या गावांना पोलिस पाटील पद निर्माण करणेबाबत महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम 1967 तसेच शासन निर्णय क्र. बीव्हीपी-0299/सीआर- 56/पोल-8, दि. 7 सप्टेंबर 1999 कलम 5 (1) पोलिस पाटलांची नेमणूक, त्यांचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्ती प्रमाणे नवीन पद निर्मितीचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान करणेत आलेले आहेत.

त्यानुसार महसूल गाव निर्माण झाल्यास तेथील पोलिस पाटलांचे पद निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करु नये, अशा सूचना देणेत आलेल्या आहेत. तसेच नियमानुसार पोलिस पाटलांची नेमणूक केल्यानंतर संबंधित जिल्हा पोलिस अधिक्षक यांना कळविण्यात यावे व त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी अर्थसंकल्पीय तरतूद करावी. महसूल वाडीचे गावात रुपांतर झालेबाबत शासनाकडील अधिसूचना पाहून त्याची खात्री करण्यात आलेली आहे.

त्यानुसार शासनाच्या नैसर्गिक आपत्ती, तसेच पोलिस यंत्रणेस गावातील शांतता, स्वास्थ्य बिघडू नये, त्याविषयी मदत करणेसाठी कामकाजासाठी तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिपत्याखाली दिलेल्या कामकाजासाठी प्रत्येक गावात पोलिस पाटील पद असणे आवश्यक आहे. सदरचे नवीन महसूल गावात पोलिस पाटील पदाची निर्मिती करणे गरजेचे असल्याने डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कर्जत यांनी भरतीचे आदेश काढले आहेत.

The post जामखेड : ‘त्या’ 58 गावांना मिळणार पोलिस पाटील ; प्रशासनाकडून हालचाली appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Jf63KRW
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: