कोपरगाव : बाजार समिती निवडणूक बिगूल डिसेंबरला

October 08, 2022 0 Comments

https://ift.tt/pt8mIao
Election

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अडीच वर्षांत कोरोना महामारीमुळे होऊ घातलेल्या अनेक निवडणुका रद्द झाल्या. त्यातच राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तीनचाकी सरकार सत्तेतून पायउतार झाले आणि शिंदे-फडणवीस शासन सत्तेत आले. आता कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल डिसेंबरमध्ये वाजला जाऊन प्रत्यक्ष मतदान 29 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे येथील सचिव डॉ. पी. एल. खडांगळे यांनी सप्टेंबर मध्ये त्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आता 10 आर क्षेत्र धारण करणार्‍या शेतकर्‍याऐवजी बाजार क्षेत्रात कार्य करणार्‍या प्राथमिक कृषि पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे.

स्थानिक पातळीवर अशा सदस्य यादीची पूर्तता करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे 1 नोव्हेंबर रोजी दाखल करावयाची आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाईल.त्यावर 23 नोव्हेंबर पर्यंत हरकती व आक्षेप मागविले जाणार आहे. आलेल्या आक्षेप हरकतीवर 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत निर्णय देवून अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द होईल. तर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम 23 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होऊन 29 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 30 डिसेंबर 2022 रोजी छाननी 2 ते 16 जानेवारी 2023 पर्यंत माघार, मतदान 29 जानेवारी 2023 तर मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होईल. या निवडणुकीकडे तालुक्यातील शेतकर्‍यांसह नागरिकांचे सर्वांचे लक्ष लागून आहे.

The post कोपरगाव : बाजार समिती निवडणूक बिगूल डिसेंबरला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/sOxhNIJ
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: