पाथर्डीतील तीर्थक्षेत्रांचा विकास करू : मंत्री कराड

October 03, 2022 0 Comments

https://ift.tt/KcmFHzX

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुका देवभूमी असून परिसरातील सर्व तीर्थक्षेत्रांचा सर्किट टुरिझम व प्रसाद स्कीममध्ये समाविष्ट करून, विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. या महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच दिल्ली येथे केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले. श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर सातव्या माळेला कराड यांनी सपत्नीक देवीचे दर्शन घेतले. मोहटा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माणिक खेडकर, दीपक गिते, विश्वस्त डॉ.ज्ञानेश्वर दराडे, भीमराव पालवे, अजिनाथ आव्हाड, अशोक भगवान दहिफळे, अशोक विक्रम दहिफळे आदी उपस्थित होते.

मोहटा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे म्हणाले, देवस्थानने या परिसराचा विकासासाठी 235 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. सर्किट टुरिझम व प्रसाद योजनेतून या विकास आराखड्याला निधी उपलब्ध होऊ शकतो. श्री क्षेत्र मोहटादेवी गडाच्या पूर्वेला दोन व पश्चिमेला दोन अशा चार नाथांच्या संजीवन समाध्या आहेत. जालिंदरनाथ, गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, वृद्धेश्वर व राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांचे जन्मगाव शिराळ चिचोंडी या देवस्थानांचा सर्किट टुरिझम मध्ये समाविष्ट केल्यास परिसराचा विकास होईल.

त्यावर मंत्री कराड म्हणाले, देशांतर्गत पर्यटनाच्या माध्यमातून या परिसराचा विकास होऊ शकतो. या विकास आराखड्याचा प्रस्ताव तात्काळ द्या, देवस्थान समितीची बैठक केंद्रीय पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांच्याबरोबर लवकरच दिल्ली येथे घेऊ. परिसरातील देवस्थाने रोपवेने जोडण्याला प्राधान्य देऊ. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करू. टप्प्याटप्प्याने पर्यटन व इतर विकासासाठी निधी दिला जाईल.

 

The post पाथर्डीतील तीर्थक्षेत्रांचा विकास करू : मंत्री कराड appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/dU4MpfJ
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: