राहुरी : दरोड्याच्या तयारीमध्ये असलेले दोघे जेरबंद

October 07, 2022 0 Comments

https://ift.tt/nwXPreb

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील धरणातील शेतकर्‍यांचा केबली व मोटारी चोरी करणारे दोघा जणांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करीत जेरबंद केले आहे. तर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. राहुरी पोलिसात या बाबत पोलिस नाईक उत्तरेश्वर मोराळे यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल केला आहे. कोल्हार खुर्द ते राहुरी रस्त्यालगत दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीबाबत पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, काही आज्ञात इसम हे दरोडाच्या उद्देशाने येथे लपलेले आहेत.

अशी माहिती समजताच पोलिस निरीक्षक दराडे यांनी पोलिस पथकाला कोल्हार खुर्द शिवारात जाण्याचा आदेश दिला. सदर पथक त्या ठिकाणी गेले असता त्यांना काही इसम दिसुन आले. पोलिस पथकाला पाहून ते पळू लागले. तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग केला व दोन जण पकडले. सुशांत शांताराम भोसले (वय 24, रा. राहुरी फॅक्टरी व अनिल आप्पासाहेब नालकर, वय 25, रा. रामपूर, ता. राहुरी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आकाश वसंत भोसले (रा. राहुरी फॅक्टरी) व दोन अनोळखी लूटारु अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपींकडून पोलिसांनी लोखंडी गज, रस्सी, मिरची पूड, चाकू, मोटरसायकल व पाणबूडी मोटर असा एकूण 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

The post राहुरी : दरोड्याच्या तयारीमध्ये असलेले दोघे जेरबंद appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/He2xLKa
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: