नगर : ‘एनओसी’चा तपास डीवायएसपींकडेे ; दोन्ही आरोपींना 10 पर्यंत कोठडी

October 08, 2022 0 Comments

https://ift.tt/9uX2MGY
fraud

नगर : पुढारी वृत्तसेवा : भिंगारमधील बनावट एनओसी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असतानाच या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, कोतवाली पोलिस व आर्मी इंटेलिजन्स यांच्या संयुक्त कार्यवाहीत आतापर्यंत दोन आरोपींना गजाआड करण्यात आले असून, दोघांनाही (दि.10) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आर्मी स्टेशन हेडक्वार्टरच्या नावाने बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून नगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी महसूल सहायक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो.

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांचे पथक करत होते. कोतवाली पोलिसांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याच्या महिला स्वीय सहायकाचा पती राजेंद्र देशराजसिंग ठाकूर उर्फ राजा ठाकूर (वय 42, रा. वैद्य कॉलनी) याला नगर-जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनी येथून अटक केली होती. त्यानंतर, (दि.6) कोतवाली पोलिस व आर्मी इंटेलिजन्स यांच्या पथकाने अलिबाग येथून दुसरा प्रमुख आरोपी रोहन किशोर धेंडवाल (रा.विद्या कॉलनी, जामखेड रोड) याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्याकडे वर्ग केला आहे.

तपास वर्ग केल्याने चर्चांना उधाण
कोतवाली पोलिसांकडून आरोपी राजा ठाकूर व त्याचा साथीदार रोहन धेंडवाल याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. अशातच तपास डीवायएसपींकडे वर्ग करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

The post नगर : ‘एनओसी’चा तपास डीवायएसपींकडेे ; दोन्ही आरोपींना 10 पर्यंत कोठडी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/tBWLwvc
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: