नगर : परवानगी न घेता वर्गणी गोळा केल्यास कारवाई

August 11, 2022 0 Comments

https://ift.tt/WE9vpRV

नगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या विविध उपक्रम व कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय वर्गणी गोळा केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अहमदनगर धर्मादाय उपायुक्तांनी दिला आहे.

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात सामाजिक, राजकीय व इतर संघटनांच्या वतीने वॉर्डातील गल्लोगल्ली विविध सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. वर्गणी गोळा करताना कोणतेही निकष मंडळांकडून पाळले जात नाहीत. जो तो उठतो, कार्यक्रमांच्या नावाने वर्गणी गोळा करतो. या वाढत्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी धर्मादाय विभाग सतर्क झाले आहे.

काही दिवसांवर गणेशोत्सव व नवरात्र हे उत्सव येत आहेत. त्यासाठी मंडळाची धावपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर धर्मादाय उपायुक्तांनी मंडळांसाठी आदेश जारी केला आहे. वर्गणी गोळागोळा करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) अन्वये धर्मादाय उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता वर्गणी गोळा केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व मंडळ तथा पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन धर्मादाय उपायुक्तांनी केले आहे.

परवानगी घेण्यासाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरणे आवश्यक आहे.

The post नगर : परवानगी न घेता वर्गणी गोळा केल्यास कारवाई appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/HB8ZqM3
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: