नगर : झेडपीचे 226 कर्मचारी चौकशीच्या फेर्‍यात

August 11, 2022 0 Comments

https://ift.tt/S64gMkv

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना सातत्याने गैरहजर राहणे, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे, दप्तरात अनियमितता, गैरव्यवहार इत्यादी कारणाने आतापर्यंत तब्बल 226 कर्मचार्‍यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये एकट्या शिक्षण विभागाच्या 111 प्रकरणांचा समावेश असल्याचीही माहीती पुढे आली आहे. दरम्यान, चौकशी अहवाल प्राप्त होऊनही 48 कर्मचार्‍यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, हे आश्चर्य आहे.

जिल्हा परिषदेच्या जून 2022 अखेरच्या एका आकडेवारीनुसार 226 कर्मचार्‍यांची वेगवेगळ्या कारणांनी विभागीय चौकशी लागली होती. यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील 111 कर्मचार्‍यांचा समावेश होता. प्रामुख्याने मध्यंतरीच्या बनावट अपंग दाखल्याप्रकरणातील ‘ते’ शिक्षकही या चौकशीत सापडले होते. याशिवाय ग्रामपंचायत विभागातील 87 कर्मचार्‍यांची चौकशी लागली होती. यात दप्तर अपूर्ण, आर्थिक अपहार, अनियमितता इत्यादी कारणे होती. याशिवाय सामान्य प्रशासन 12, कृषी 1, आरोग्य 5, अर्थ 3, बांधकाम उत्तर 3, बांधकाम दक्षिण 3, महिला व बालकल्याण 1 असा समावेश होता.

अशाप्रकारे 226 कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी सुरू होती. यापैकी चौकशी पूर्ण होऊन 190 कर्मचार्‍यांचे अहवाल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त आहेत. यात शिक्षण विभागाचे 104 अहवाल प्राप्त आहेत, तर ग्रामपंचायतीचे 66 अहवाल प्राप्त आहेत. प्राप्त 190 पैकी 16 प्रकरणे शिक्षेसह निकाली निघालेली आहेत, तर 174 प्रकरणे प्रलंबित दिसत आहे. यामध्ये 126 प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे खर्‍याअर्थाने उर्वरित 48 प्रकरणे प्रलंबित असल्याचे पुढे आले आहे. मात्र, संबंधितांवर काय कारवाई झाली किंवा का झाली नाही, याबाबत अधिकृत समजू शकले नाही.

सहा महिने उलटूनही 23 जणांवर कारवाई नाही

चौकशी अहवाल प्राप्त होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊन सुद्धा अद्या शिक्षकेची कार्यवाही न झालेल्या प्रकरणांची संख्या 23 इतकी आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई का होऊ शकली नाही, याविषयी जि. प. वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

‘ती’ प्रकरणे पुन्हा चर्चेत!

मध्यंतरी फौजदारी स्वरूपाची गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही कर्मचार्‍यांना विभागीय चौकशीनंतर जिल्हा परिषदेतून निघालेल्या अंतिम आदेशात आश्चर्यकारकरित्या ‘अभय’ देण्यात आल्याची चर्चा होती. यामध्ये अर्थ, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे सीईओ आशिष येरेकर आणि अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनी अशा प्रकरणांची पुन्हा पडताळणी करावी, असाही सूर आहे.

The post नगर : झेडपीचे 226 कर्मचारी चौकशीच्या फेर्‍यात appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/X5tDzr2
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: