नगर : मंत्री विखे-थोरातांचे आरोप-प्रत्यारोप

August 17, 2022 0 Comments

https://ift.tt/QgfbrW7

नगर, पुढारी वृत्तसेवा : नगरच्या राजकारणातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात स्वातंत्र्यदिनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या. अनेकदा महसूलमंत्री पद भोगलेले आ. थोरात यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी जाहीर करताच, आ. थोरात यांनी ‘फार कमी काळासाठी मंत्रीपद मिळालं, चांगलं काम करावं’ असा टोला लागवतानाच आ. थोरात यांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर न देता त्यांना बेदखल केले.

कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळाले, चांगलं काम करावं

राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूलमंत्री पद मिळालं आहे. या काळात त्यांनी चांगलं काम करावं. आमच्या कार्यकाळातील कामाची काय चौकशी करायची ती करावी, असे प्रत्युत्तर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या वक्तव्यावर दिले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

विखे यांनी गतकाळात महसूल विभागावर केलेल्या आरोपाची आठवण पत्रकारांनी करून दिल्यानंतर मंत्री विखे मागील काळातील महसूल विभागातील कामाची चौकशी करू असे म्हणाले होते. त्यानंतर नगरमध्ये थोरात यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखेंना प्रत्युत्तर दिले. दोन महसूलमंत्र्यांच्या कामातील फरक दाखवून देऊ, असे वक्तव्य करणार्‍या खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना तर बाळासाहेब थोरात यांनी बेदखल केले. उत्तर देऊन त्यांना महाराष्ट्रात प्रसिद्धी द्यावी, असं मला वाटत नाही. जनतेने माझा कारभार पाहिला, आता त्यांचा कारभार जनता पाहील, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

‘महसूल’ची गतकाळातील चौकशी करावी लागेल

भ्रष्टाचारमुक्त सरकार हाच भाजप-शिंदे सरकारचा अजेंडा आहे. मागील काळात महसूल खात्यामध्ये काय घडले आहे, याची चौकशी करावी लागेल, असा सूचक इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पूर्वीसारखे आरोप आगामी काळात भाजप-शिंदे गटाच्या सरकरावर होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगतानाच विखे पाटील भ्रष्टाचारमुक्त सरकार हाच अजेंडा असल्याचे म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेऊ, असेही विखे पाटील म्हणाले.

The post नगर : मंत्री विखे-थोरातांचे आरोप-प्रत्यारोप appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/SZuiFBv
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: