नगर : तीन ग्रामपंचायतींचा आज निकाल

August 05, 2022 0 Comments

https://ift.tt/Q4ZpGSh

नगर तालुका/वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील भातोडी, बाबुर्डी घुमट व पिंपळगाव उज्जैनी या तीन गावात आज (गुरूवारी) शांततेत 88 टक्के मतदान झाले. चुरशीच्या निवडणुकीमुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे . काल सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यांनतर दुपारी 12 पर्यंत तीनही गावांत निम्म्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत हीच टक्केवारी 65 टक्क्यांच्या पुढे गेली होती. चुरशीची निवडणूक होत असल्याने सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. गावाबाहेर राहणार्‍या मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत . सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या जागेसाठी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांविरोधात एक महिला अपक्ष म्हणून उभी ठाकली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे . बाबुर्डीत सर्वाधिक 92 टक्के मतदान झाले. येथे दिवसभर मतदारांच्या रांगा होत्या. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुध्द भाजप म्हणजेच माजी आमदार शिवाजी कर्डिले समर्थकांमध्ये रंगणार आहे.

महाविकास आघाडीकडून माजी सरपंच जनार्धन माने, भाऊसाहेब चव्हाण, उन्नाव परभाणे, नारायण माने यांच्या नेतृत्वाखालील आघाडी असुन कर्डिले गटाकडून भाऊसाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यात सरळ काट्याची लढत होत आहे. भातोडी गावातही 9 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत . दोन प्रभागात दुरंगी तर एका प्रभागात तिरंगी लढत होत आहे. यात बहुतांशी जागांवर पक्षीय राजकारण बाजूला ठेवत गावातील गट-तट एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

भातोडीतही चुरशीची लढाई होत असून, गावात 83 टक्के मतदान झाले. पिंपळगाव उजैन्नी गावात कर्डिले समर्थक जगन्नाथ मगर व ईस्माइल शेख यांनी आघाडी केली आहे. त्यांच्या विरोधात गावातील एक कर्डिले गट व तनपुरे गट एकत्र आला आहे . या गावात सरासरी 89 टक्के मतदान झाले. तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजित बारवकर दिवसभर निवडणुकीवर लक्ष ठेवून होते.

आज बारा वाजेपर्यंत लागणार निकाल
नगर तालुक्यातील भातोडी, बाबुर्डी व पिंपळगाव उज्जैनी गावांत चुरशीची निवडणूक झाली. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल लागतील, अशी शक्यता आहे.

The post नगर : तीन ग्रामपंचायतींचा आज निकाल appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/q0ictlw
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: