मिरजगाव : दरोडा टाकण्याचा डाव उधळला

August 04, 2022 0 Comments

https://ift.tt/Ru6TcX7
क्राईम

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : दरोडा टाकण्याच्या तयारित असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मिरजगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून (दि.2) रोजी शहरात 5 संशयित आरोपींचा पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. महेश मंगेश काळे (रा. कुळधरण, ता. कर्जत), गणेश अभिमान काळे (रा. राशीन, ता. कर्जत) अशी अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. पळुन गेलेल्यापैकी गणेश मंगेश काळे, भैया ऊर्फ अमोल राजा पवार अशी दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी त्याच्या वाहनाची झाडाझडती घेतली असता एक लोखंडी चाकू, मिरची पावडर, तीन मोबाईल, दोन मोटारसायकल असा ऐवज पोलिसांना मिळून आला. सदर आरोपींविरूद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींविरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात याआधी गुन्हे दाखल आहेत, तसेच आरोपी महेश मंगेश काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भिगवण पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण, दौंड, करमाळा, सोलापूर ग्रामीण, यवत, श्रीगोंदा, बंडगार्डन, पुणे शहर, इंदापूर, लोणी काळभोर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

तसेच दुसरा आरोपी गणेश अभिमान काळे याच्यावर कर्जत, करमाळा, सोलापूर ग्रामीण, टेंभुर्णी जामखेड, दौंड या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, भाऊसाहेब येमगर, गणेश ठोंबरे, वैभव सुपेकर, राहुल सकट व श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर बबन अभंग परी, प्रदीप बोर्‍हाडे, अंकुश राजाराम ढवळे, किरण संजय बोराडे, प्रकाश नवनाथ मांडगे, दादासाहेब भाऊसाहेब टाके, अमोल पोपट कोतकर आदींच्या पथकोन केली.

The post मिरजगाव : दरोडा टाकण्याचा डाव उधळला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XTrxWHR
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: