निमज, बिरेवाडी ग्रामपंचायतींत आ. थोरातांचे वर्चस्व

August 06, 2022 0 Comments

https://ift.tt/0PUIRtQ

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात निमज व बिरेवाडी या दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे विधिमंडळ गट नेते, माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे वर्चस्व राहिले, तर मांडवे बु. ग्रामपंचायतवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास आणि वीरभद्र विकास मंडळाने 8 जागा जिंकून निर्विवाद बहुमत सिद्ध केले, तर विरोधी शेतकरी विकास मंडळाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले.

निमज, बिरेवाडी व मांडवे बु.या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका गुरुवारी पार पडल्या. आज शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात निवडणूक निकाल जाहीर झाला. निमज ग्रामपंचायतीवर संगमनेर शेती संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणित शेतकरी विकास मंडळाने दहा वर्षांची विरोधकांची सत्ता उखडून टाकत अक्षरशः धुव्वा उडवित सर्वच्या सर्व 11 जागा जिंकून विजयश्री खेचली.

विजयी उमेदवार व मिळालेली मतेः अलका बंडू गिर्हे (477), अरुण बाजीराव गुंजाळ 451), विमल नवनाथ कासार (458), सागर अण्णासाहेब डोंगरे (459), साहेबराव विश्व नाथ मतकर (369), ताराबाई रविंद्र कासार (409), दिलीप शंकर बिबवे (318), कविता गुलाब डोंगरे (335), हरी किसन संजय जग दाळे (392), वंदना विनोद लष्करे (441) व सुरेखा महेश बिबवे (412) यांनी विजय संपादीत केला.
बिरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेरनार व थोरात साखर कारखाना संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाने 8 जागा जिंकून विजयश्री खेचून आणली. विरोधी शिवसेनेचे गुलाबराजे भोसले यांच्या गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार व मिळालेली मतेः अण्णा भागा कढणे (292), तुळशीराम फकिरा गळंगे (251), शीतल दिनकर ढेंबरे (272), पोपट बाळासाहेब नान्नर (372),जिजाबाई भाऊसाहेब नान्नर (364) व नीलम पांडुरंग ढेंबरे (326) यांचा, तर शिवसेनेच्या पंढरीनाथ भाऊ ढेंबरे (308), स्वाती नानासाहेब भोसले(298), शारदा नवनाथ सागर (292) यांचा विजय झाला. मांडवे बु. निवडणुकीत शिवसेना नेते बाबासाहेब कुटे, उद्योजक आदिकराव खेमनर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्राम विकास मंडळाने निवडणुकीत सत्ताधार्‍यांना पराभवाची धुळ चारत शेतकरी विकास मंडळाचे नेते, उपसरपंच भाऊसाहेब डोलनर यांचासुद्धा दारुण पराभव पत्कारत त्यांच्या गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले.

मांडवे बु. ग्रामपंचायत निवडणुकीत आशा बाबासाहेब कुटे (407), मनिषा संतोष बिडकर (228) , शाबीर पीरमोहम्मद सय्यद (230), भास्कर श्रीरंग बर्डे (291), बाळासाहेब आबाजी खेमनर (306), शीला संदीप आयनर (316), जितेंद्र देवराम उमप( 404) सना सलीम शेख (395 तर विरोधी शेतकरी विकासचे तुषार एकनाथ धुळगंड (424), अलकाबाई विठ्ठल तरंगे व (483), अर्चना दगडू धुळगंड (434), ) यांनी विजय संपादन केला.

शिवसेना नेते कुटे यांना मिळाला दिलासा..!
संगमनेर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाने निमजमध्ये दहा वर्षांच्या सत्तेचा दुष्काळ संपवतांना भाजप व मित्र पक्षांचा धुव्वा उडविला तर बिरेवाडीत जातीय समिकरणातून सत्ता काबीज करण्याचा प्रकार नाकारत मतदारांनी शेतकरी मंडळावर विश्वास दाखवला. मांडवे बुद्रुकचा निकाल शिवसेनेचे नेते बाबासाहेब कुटे यांना दिलासा देणारा ठरला..

The post निमज, बिरेवाडी ग्रामपंचायतींत आ. थोरातांचे वर्चस्व appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/wDvWeyR
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: