शिर्डी : जिल्हा परिषद शिवसेना स्वबळावर लढणार : संपर्कप्रमुख बबनराव घोलप

August 03, 2022 0 Comments

https://ift.tt/2O4FGpK

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : शिर्डीचे बंडखोर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेंना उत्तर द्यायला शिवसैनिक समर्थ आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार आहोत, असे मत व्यक्त करत शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभेसाठी ‘एकला चलो रे’ ची घोषणा दिली आहे. संपर्क प्रमुख होताच बबनराव घोलप यांनी शिर्डी दौरा करीत पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आढावा बैठक घेतली घोलप म्हणाले, लोखंडे एकटेच गेले, आता मी आल्याने गट-तट राहाणार नाहीत.

शिर्डी लोकसभा मतदार संघात सेना भक्कम असून कोणतीही गद्दारी होणार नाही. इथे साखर सम्राट असले तरी आता त्यांना मतदान न देता आता आम्हालाच मतदान मिळणार आहे. कोणी शिवसैनिक त्यांच्या दावणीला बांधले गेले असतील तर त्या दावण्या मी काढून घेईल, असा सुचक इशारा बबनराव घोलप यांनी दिला आहे. न्यायालयात शिवसेनेचाच विजय होईल.जे फुटले त्यांच्या अजून बारीक ठिकर्‍या होतील.आमचा एकटा वाघ त्यांच्याशी लढत होता म्हणून राऊतांवर कारवाई केली. प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. राऊत म्हणजे न घाबरणारा शिवसैनिक आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांसह शिवसेनेला संपवण्याची भाषा भावनेच्या भरात केली असावी. कदाचित आज उद्या खुलासा करतील की मला तसे म्हणायचे, असा टोलाही त्यांनी लगावला. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहाणार आहे. हे स्वर्गीय बाळासाहेबांनी निर्माण केलेले चिन्ह, ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वास घोलप यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभेचे तिकीट कुणाला द्यायचे हे पक्ष ठरविल. निवडून कुणाला द्यायचे हे कार्यकर्ते ठरवतील.

संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना तळागाळात नेण्याची माझी जबाबदारी आहे. शिर्डी लोकसभेसाठी मी असेल किंवा नसेल मात्र जो असेल तो घोलपच असेल, असेही घोलप यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे , जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पठारे, तालुका प्रमुख संजय शिंदे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन कोेते, शिवसेना नेते कमलाकर कोते, सुहास वहाडणे, जिल्हा संघटक विजयराव काळे, प्रमोद लबडे, भरत मोरे , कलविंदर दडीयाल, अमर कतारी, माजी नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे, ग्राहक कक्षाचे सिनगर, सुनिल परदेशी आदिंसह उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post शिर्डी : जिल्हा परिषद शिवसेना स्वबळावर लढणार : संपर्कप्रमुख बबनराव घोलप appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/28KkieV
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: