नगर : शालेय पोषण आहारावर भरारी पथकाचा वॉच..!

July 24, 2022 0 Comments

https://ift.tt/pfSgCvz

नगर : पुढारी वृत्तसेवा : शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार आता जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. संबंधित पथक हे जिल्ह्यातील 3500 पेक्षा अधिक शाळांमधील पोषण आहारावर ‘वॉच’ ठेवणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळांमधून विद्यार्थ्यांना चांगला आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. मात्र, राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे, इत्यादी स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

प्रत्येक जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. एक अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती असेल. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील शाळामध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही, याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. भरारी पथकामार्फत जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच नागरी भागातील (महापालिका, नगरपालिका, नगरपारिषद व कटकमंडळ) पात्र शाळांची आणि केंद्रीय स्वयंपाकगृहांची तपासणी करण्यात येणार आहे.

सीईओ हे भरारी पथकांमधील अधिकारी, कर्मचार्‍यांची नावे निश्चित करणार आहेत. त्यानंतर संबंधित पथकास शाळा तपासणीचा कार्यक्रम निश्चित करून दिला जाईल. भरारी पथकाचा शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात असेल, जेणेकरुन अचानक शाळा तपासणी होऊन वस्तुस्थिती निदर्शनास येईल. भरारी पथक कार्यान्वित होण्यासाठी एक अधिकारी आणि किमान दोन कर्मचारी यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, या भरारी पथकामुळे शाळांमधील पोषण आहारातील अनियमिततेस आळा बसणार आहे.

The post नगर : शालेय पोषण आहारावर भरारी पथकाचा वॉच..! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/WbwLy7R
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: