नगर : झेडपीच्या 271 कामांची 28 जुलैला सोडत!

July 20, 2022 0 Comments

https://ift.tt/ImeL4aU

नगर : पुढारी वृत्तसेवा :  झेडपीतून 372 काम वाटपांची सोडत पुरेसे अर्ज न आल्याने 12 जुलैला रद्द करून त्याची फेरप्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, आता फेरप्रक्रियेत ऑनलाईनला 372 नव्हे, तर 271 कामे पडल्याने वरची 101 कामे नेमकी कुठे, कशी व कोणाला गेली, याबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या कामांची आता 28 जुलैला सोडत होणार आहे.

जिल्हा परिषदेतून ग्रामपंचायतीला प्राधान्याने कामे देण्यात येतात. ज्या ग्रामपंचायती स्वतः कामे करण्यासाठी तयार आहेत, अशा ग्रामपंचायतींना ‘ती’ कामे दिल्यानंतर उर्वरित कामांचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था आणि खुल्या वर्गातील अभियंता अशा तिघांना 33-33-33 टक्के प्रमाणे वाटप केले जाते.

सध्या दुसर्‍यांदा सुरू असलेल्या प्रक्रियेत ग्रामपंचायतीला 101 कामे देण्यात आली असून उर्वरित 217 कामांचे वाटप केले जाणार आहे. यात उत्तर बांधकाम विभागांतर्गत 160, तर दक्षिण बांधकाम विभागातून 101 कामांचे वाटप केले जाणार आहे, तसेच पाणी पुरवठा विभागाचे 7 आणि लघू व पाटबंधारेची 3 अशी एकूण 271 कामांचे वाटप केले जाणार आहे.

12 जुलैची सोडत रद्द झाल्यानंतर सोमवारी संबंधित कामांची यादी ऑनलाईन अपलोड करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुन्हा अर्ज सुरू झाले आहे. 25 जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे. आलेल्या अर्जांतून संगणकीय पद्धतीने कामांची सोडत केली जाणार आहे.

The post नगर : झेडपीच्या 271 कामांची 28 जुलैला सोडत! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/sglIMrp
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: