चिंचपूर पांगुळ येथून दीड लाखाचा ऐवज लांबविला

https://ift.tt/hH3bVTc
robbery

चिंचपूर पांगुळ : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील बंगल्याच्या बंद खोलीतील कपाटातून चोरट्यांनी रोख रक्कम, तसेच दागिने असा एक लाख चोपन्न हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी (दि.30) पहाटे तीनच्या सुमारास घडली.
येथील जगन्नाथ किसन बडे आणि त्यांचे भाऊ साहेबराव किसन बडे व परिवारातील इतर सदस्य शुक्रवारी रात्री जेवण करून दहाच्या सुमारास झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास ते झोपलेल्या खोल्यांच्या दाराच्या कड्या बाहेरून लावून घेत, ही चोरी करण्यात आली आहे.

बडे यांना पहाटे जाग आल्यानंतर बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणारे केशव बडे यांना फोन करून बोलावून घेत दरवाजा उघडला असता सदर खोलीचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. घरात जाऊन पाहिले असता त्यांना कपाटातील कपडे व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या व त्यातील दागिने व रोख रक्कम गायब झाल्याचे दिसून आले.

याबाबत जगन्नाथ किसन बडे यांनी पाथर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी श्वान पथकासह येऊन पाहणी केली. परंतु, चोरट्यांनी वाहनांचा वापर केल्याने माग निघू शकला नाही. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

The post चिंचपूर पांगुळ येथून दीड लाखाचा ऐवज लांबविला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/JIWDvHy
via IFTTT

नगर : जिल्ह्यामध्ये उद्यापासून ‘अमृत पंधरवडा अभियान’

https://ift.tt/fm1YXex

नगर : पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेनेही या चळवळीत सहभाग नोंदविताना ‘अमृत पंधरवडा अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सूचनेनुसार समाजकल्याण विभाग हा जिल्ह्यातील शंभर टक्के ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करणार आहे. रोजगार हमी विभाग झेडपीच्या शाळा आणि अंगणवाड्यांभोवती जैविक संरक्षक भिंती उभारणार आहे.

शिक्षण विभाग 150 शाळांना लोकसहभागातून शुद्ध पाणी पुरवठा व अन्य भौतिक सुविधा देणार आहे. माध्यमिक शिक्षण विभाग 151 शाळा आदर्श करणार आहे. ग्रामपंचायत विभाग एकल महिलांची नोंदणी करणे, किमान 25 टक्के संशयित अपहार प्रकरणे जिल्हा परिषदेकडे सादर करणार आहे. लघू तालुका पाटबंधारे विभाग जलशक्ती अभियानात किमान 45 बंधारे बांधून पूर्ण करणार आहेत.
बांधकाम उत्तर आणि दक्षिण विभाग किमान 100 शाळा, अंगणवाडी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणार आहे, तसेच नव्याने तपासणी करून गळती लागलेल्या इमारतींचे दोष निवारण कालावधीत दुरुस्ती करणार आहे.

पाणी पुरवठा विभाग हर घर जल योजनेत प्रत्येक तालुक्यातून किमान पाच गावांत या योजनेचा लाभ देणार आहे. कृषी विभाग महाडीबीटीमार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांचे कागदपत्रे 100 टक्के जमा करून शेतकर्‍यांना बांधावर खतांचे वाटप करणार आहे. महिला बालकल्याण विभाग सॅम आणि मॅम श्रेणीतील बालकांची आरोग्य तपासणी करणार आहे. दरम्यान, सीईओ येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी या अभियानाबाबत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत, तसेच या पंधरवाड्यात नियोजन केलेल्या कामांत हलगर्जीपणा केल्यास कारवाईची तशी ताकीदही दिली आहे.

The post नगर : जिल्ह्यामध्ये उद्यापासून ‘अमृत पंधरवडा अभियान’ appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RhgHjxT
via IFTTT

भिंगाणला स्मशानभूमीसाठी दहा लाख : आ.पाचपुते

https://ift.tt/zQLRb0o

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे पावसात वर ताडपत्री धरून मृत व्यक्तीच्या चितेला दोनदा अग्निडाग द्यावा लागला. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाग येईल का? असा सवाल येथील आदिवासी समाजाने केल्यानंतर हेच वास्तव ‘दैनिक पुढारी’ने वृत्तातून मांडले. त्याची तातडीने दखल घेत आमदार बबनराव पाचपुते यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून सुमारे दहा लाख रुपयांचा निधी येथील स्मशानभूमीसाठी मंजूर केल्याचे ‘दैनिक पुढारी’शी बोलताना सांगितले.
तालुक्यातील भिंगाण येथील आदिवासी समाजातील अंकुश गुलाब गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला.
स्मशानभूमीला वर शेड नसल्याने मुसळधार पावसात अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न होता. मृतदेह जास्त वेळ ठेवता येणार नसल्याने, सर्वांनी मिळून वर ताडपत्री धरून दोनवेळा अग्नी देऊन अंत्यविधी केला. स्मशानभूमीअभावी मृत व्यक्तींची होत असलेली हेळसांड, गावातील नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा, आदिवासी समाजाकडे प्रशासन व नेतेमंडळींचे होत आलेले दुर्लक्ष याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते
आमदार बबनराव पाचपुते यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन भिंगाण येथील आदिवासी समाजातील लोकांच्या स्मशानभूमीसाठी सुमारे दहा लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर केले आहेत. तसे पत्र आमदार पाचपुते यांनी चोराचीवाडी ग्रामपंचायतीला दिले आहे. त्याबद्दल चोराचीवाडी येथील कार्यकर्ते तुकाराम चव्हाण, भीमराव लांडगे, अ‍ॅड.जे. डी. अनभुले यांनी त्यांचे आभार मानले.

गावात मूलभूत सुविधांची वानवा
देशाच्या स्वातत्र्यांला 75 वर्षे पूर्ण होत आलेली असताना, हे आदिवासीबहुल गाव विकासापासून वंचित आहे. गावात आरोग्य, वीज, अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी या मुख्य समस्या आहेत. त्यांची सोडवणूक करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मिळालेल्या निधीमुळे आदिवासी समाजाच्या समशानभूमीचा प्रश्न सुटेल, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

The post भिंगाणला स्मशानभूमीसाठी दहा लाख : आ.पाचपुते appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4aln20U
via IFTTT

विवाहितेच्या गर्भपाताचा प्रयत्न; तिघांना अटक

https://ift.tt/LFxps7g

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन विवाहितेला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, विवाहितेचा पती, सासू-सासर्‍याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विवाहितेच्या पतीला 1 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, सासू-सासर्‍याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन विवाहितेच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नगर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या तरुणाचे फिर्यादीसोबत लग्न झाले होते. लग्नासाठी झालेल्या खर्चाची मागणी करत पती, सासू-सासर्‍याने फिर्यादीचा छळ केला. मारहाण, दमदाटी केली. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केले, तसेच गर्भधारणा झाल्यानंतर हे मूल माझे नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली. गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला देवून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पाठक, अंमलदार विजय नवले यांच्या पथकाने तिघांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पाठक करीत आहेत.

The post विवाहितेच्या गर्भपाताचा प्रयत्न; तिघांना अटक appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/6ozAh5R
via IFTTT

नगर : 121 कोटींच्या 81 योजनांना मान्यता!

https://ift.tt/mRPfvKU

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून 2024 पर्यंत 1005 गावांकरिता स्वतंत्र पाणी योजना उभारण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. यामध्ये 481 योजनांची कामे प्रगतिपथावर असून, नुकतीच 121 कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या नवीन 81 कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दरम्यान, या कामांच्याही निविदा आणि वर्कऑर्डर लवकर करण्यासाठी जिल्हा परिषदेतून मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे.

नगर जिल्हा हा विस्ताराने सर्वाधिक मोठा आहे. येथील अनेक गावे आजही हंडाभर पाण्यासाठी वणवण करत असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने जलजीवन मिशन योजना हाती घेऊन, त्यातून 1005 पेक्षा अधिक गावांसाठी 900 योजनांचा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांनी जलजीवन मिशन योजनेला गती दिली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 481 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यामधील 287 कामांच्या निविदा आणि त्यानंतर वर्कऑर्डरही झाल्या आहेत. ही कामे आज प्रगतिपथावर असून, उर्वरित कामेही निविदा स्तरावर असल्याने, ती देखील लवकरच सुरू होणार असल्याचे समजले. पूर्वीची कामे वेगात सुरू असताना, आता नव्याने 81 कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या योजनांसाठी 121 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतून मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर हे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जातीने लक्ष देऊन आहेत. त्यामुळे योजना गती घेताना दिसत आहे.

कोणकोणत्या पाणी योजनांना मंजुरी

नगर ः देवगाव, चास, उक्कडगाव, निंबळक. अकोले ः बारी, लहीत बु., सावरकुटे, शेंडी, साकीरवाडी, सांगवी, मुतखेल, भोलेवाडी, शिंगणवाडी, आंबेवंगण, साम्रद, बोरी. नेवासा ः लेकुरवाळी आखाडा, नागापूर. संगमनेर ः जांभुळवाडी, निमगाव टेंभी, वनकुटे, घारगाव, गोडसेवाडी, शिबलापूर, जांबुद खु., कनकापूर, खराडी. जामखेड ः जवळके, गिरवली, आपटी, लोणी, दौंडाचीवाडी, जायभायवाडी, पाटोदा, पाडळी, धामणगाव, रत्नापृूर, मतेवाडी. कर्जत ः मानेवाडी, नांदगाव, सीतपूर, रुईगव्हण, धोंदेवाडी, घुमरी, नागलवाडी, तळवडी, डोंबाळवाडी, डिकसल, बेर्डी, देशमुखवाडी, चिंचोली काळदात, नेटकेवाडी, मलठण, करभानवाडी, चखालेवाडी, भोसे, हिंगणगाव, बहिरोबावाडी, वायसेवाडी, देऊळवाडी, राक्षसवाडी खुर्द. पारनेर ः सांगवी सूर्या, घाणेगाव, हंगा, ढोकी, गुणोरे, गतेवाडी, शेतीकासारे, रेनवडी, तिखोल, पिंपळनेर, जातेगाव, म्हसे खुर्द. श्रीगोंदा ः सारोळा. राहाता ः गोगलगाव. कोपरगाव ः संवत्सर. राहुरी ः केसापूर. शेवगाव ः कर्‍हेटाकळी.

 

The post नगर : 121 कोटींच्या 81 योजनांना मान्यता! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/PzEoyhK
via IFTTT

नगर : ‘स्वयंभू’ला दोन लाखांचा दंड ! घनकचरा विभागाकडून प्रस्ताव

https://ift.tt/NZdsXRl

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील कचरा सहा-सात दिवस पडून राहतो, या तक्रारीमध्ये महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना तथ्य आढळून आले आहे. त्यांनी तसा अहवाल घनकचरा विभागाला दिला आहे. त्यानुसार घनकचरा विभागाने कचरा उचलणारी खासगी कंपनी स्वयंभू ट्रान्सपोर्टवर दोन लाखांचा दंड प्रस्तावित केला आहे. उपायुक्तांनी ‘स्वयंभू’कडून खुलासा मागविला आहे. नगर शहरातील दररोजचा कचरा उचलण्याचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आलेला आहे.

त्यासाठी महापालिकेने कचरा उचलण्यासाठी वाहने पुरविली आहेत. ही वाहने दररोज शहरातील विविध विभागातून कचर्‍याचे संकलन करतात. मात्र, सावेडी उपनगरामध्ये अनेक विभागात सहा ते सात दिवस कचर्‍याची वाहने येत नाहीत. तशा तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. तर, स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी सावेडी उपनगरामध्ये कचर्‍याची वाहने येत नाही. कचर्‍याची वाहने केवळ हॉटेलसमोर थांबतात, असा आरोप केला होता.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी सावेडी उपनगरामध्ये तपासणी केली. त्यात काही ठिकाणी कचर्‍याचे वाहन जात नसल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार कचरा संकलन करणार्‍या स्वयंभू कंपनीवर दोन लाखांचा दंड प्रस्तावित केला आहे. सध्या त्याची फाईल उपायुक्तांच्या दालनात आहे. उपायुक्तांनी स्वयंभू कंपनीकडून खुलासा मागविला आहे. मात्र, कंपनीने अद्यापपर्यंत खुलासा दिलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजली.

The post नगर : ‘स्वयंभू’ला दोन लाखांचा दंड ! घनकचरा विभागाकडून प्रस्ताव appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jIBF8oV
via IFTTT

नगर : स्वामी समर्थ मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला

https://ift.tt/4IZWjfg

सोनई, पुढारी वृत्तसेवा : येथील महादेव मंदिराजवळील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात बुधवारी रात्री 12:30 वाजता दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी गज कापून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेश तरुण मंडळातील 25 ते 30 सदस्य मंदिराला पोलिसांसह घेराव घालण्याच्या तयारीत असताना चोरट्यांनी तेथून पळ काढला.

गज कापण्याचा आवाज आल्याने मंडळातील कार्यकर्त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून वेगवेगळ्या मार्गाने घेराव घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरटे पळून गेले. या गडबडीतच चोरट्यांची हातोडी, चाकू, रॉड व बुटाचे जोड तेथेच राहिले. रात्री दोन वाजेपर्यंत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, अंधाराचा फायदा घेऊन तेे पळून गेले. दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी अनेक मंदिरे फोडून चोर्‍या केल्या होत्या. त्यानंतर काही काळ चोर्‍या थांबल्या होत्या. आता पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा बसवावेत

सोनईत मोठा गाजावाजा करून लोकवर्गणीतून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली. पण, काही काळानंतर दुरुस्तीच्या नावाने कॅमेरे काढून घेतलेले असून अजूनही कॅमेरे बसविलेले नाहीत. लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

The post नगर : स्वामी समर्थ मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/wMYqfTW
via IFTTT

आदित्य की यात्रा फ्लॉप करेंगे एकनाथ? 3 जिलों में शिंदे करेंगे मीटिंग

महाराष्ट्र में शिंदे बनाम ठाकरे का नजारा अब तीन जिलों में देखने को मिल सकता है। दरअसल, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद समेत कुछ जिलों के दौरे पर हैं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी उन्हीं जिलों में बड़ा अभियान शुरू करने जा रहे हैं। https://ift.tt/XN1DWlG

नगर : झेडपी आरक्षणात प्रस्थापितांना धक्के!

https://ift.tt/OWQD5NX

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 85 गटांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये काही इच्छुकांच्या गटांत अनुसूचित जाती-जमातींची आरक्षणं पडली, तर कुठे महिला, सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने संबंधितांच्या राजकीय अडचणीत वाढ झाली आहे. यामध्ये माजी पदाधिकारी राजश्रीताई घुुले, प्रतापराव शेळके, सुनील गडाख, मीराताई शेटे, उमेश परहर यांच्यासह राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे आदींना सुरक्षित गट शोधावे लागणार आहेत. तर शालिनीताई विखे, काशीनाथ दाते, शरद नवले आदींचे गट सुरक्षित राहिले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून इच्छुकांनी तयारीला वेग दिला आहे. जुनमध्ये गट-गणांची अंतिम रचना झाल्यानंतर अनेकांना आरक्षण सोडतीचे डोहाळे लागले होते. काल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात 85 गटांचे आरक्षण काढले, तर 170 गणांचे आरक्षण हे ‘त्या त्या’ तालुक्यात निघाले.

कोणाचे गट राहिले सुरक्षित!

शालिनीताई राधाकृष्ण विखे, काशीनाथ दाते, संदेश कार्ले, मिलींद कानवडे,अजय फटांगरे, कविता लहारे, शरद नवले, संगीता गांगुर्डे, आशाताई दिघे, भाग्यश्री मोकाटे, उज्ज्वला ठुबे, वंदनाताई लोखंडे.

दिग्गजांच्या सौभाग्यवतींना संधी?

अर्थ समितीचे माजी सभापती सुनील गडाख, जालिंदर वाकचौरे, राजेश परजणे, राहुल राजळे, शरद झोडगे यांच्या गटांवर महिला सर्वसाधारण, ना.मा.प्र महिलांचे आरक्षण पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्या सौभाग्यवतींना संधी द्यावी लागणार आहे. तर, काहींना इतर सोयीचा गट शोधून त्या ठिकाणाहून नशीब अजमावे लागणार आहे.

‘त्या’ गटांत पतीराज, सुपूत्र आखाड्यात!

काही गटांत महिलांचे आरक्षण पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. मात्र, या ठिकाणी त्यांनी आता आपल्या सौभाग्यवतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे ज्या महिला सभागृहात होत्या, त्या ठिकाणी ‘सर्वसाधारण’ निघाल्याने आता ‘पतीराज’ मैदानात दिसणार आहेत. यात अर्जून शिरसाठ, बाळासाहेब हराळ यांना संधी आहे. वांबोरीतून शशिकला पाटील यांचे सुपुत्र उदयसिंह सुभाष पाटील आणि अकोलेतून जालिंदर वाकचौरे यांची उच्चशिक्षीत कन्या सायली वाकचौरे निवडणुकीच्या आखाड्यात दिसू शकतात.

‘या’ महिला नेतृत्वाचे राजकीय भवितव्य काय?

अनुराधा नागवडे, सुवर्णा जगताप, पंचशीला गिरमकर, सुनीता खेडकर, ताराबाई पंधरकर यांच्या गटांमध्ये अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या माजी सदस्या आता कोणत्या गटातून लढणार, याची जनतेतून उत्कंठा वाढली आहे.

सुरक्षित गट शोधावा लागणार !

जि. प. माजी उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याण समितीचे माजी सभापती उमेश परहर, गुलाबराव तनपुरे, धनराज गाडे, माधवराव लामखडे, रमेश देशमुख, भाऊसाहेब कुटे, रोहीणीताई निघुते, सीताराम राऊत, रामहरी कातोरे, सुधाकरराव दंडवते, शाम चंद्रकांत माळी, दादासाहेब शेळके, दत्तात्रय काळे, सुप्रियाताई पाटील, सविता आडसुरे आदींच्या गटांवर वेेगवेगळ्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे जर पुन्हा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांना आता अन्य सुरक्षित गट शोधावा लागणार आहे.

‘सर्वसाधारण’ मध्येही ‘या’ महिलांचा दबदबा!

काही महिला माजी सदस्यांचे गट खुले झाल्याने या ठिकाणी आता महिलांनाच कितपत संधी मिळेल, याविषयी साशंकता आहे. मात्र, आपल्या पाच वर्षांच्या विकास कामांच्या जोरावर ‘सर्वसाधारण’ मधूनही त्यांना पक्षनेतृत्व पुन्हा संधी देऊ शकते. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीराताई शेटे यांच्यासह राणीताई लंके, प्रभावती ढाकणे, सुनीता भांगरे, तेजश्री लंघे, संध्या आठरे, सुषमा दराडे, पुष्पा वराळ, शांताबाई खैरे, पुष्पा रोहोम, मंगलताई पवार, नंदाताई गाढे, संगीता दुसुंगे आदी महिला नेतृत्व सभागृहात पुन्हा दिसणार का? याकडे नजरा असणार आहेत.

घुले, काकडेंकडून सुरक्षित गटांत चाचपणी

जि.प. माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचा दहिगावने हा गट ना.मा.प्र. साठी राखीव आहे. तर , भातकुडगाव आणि मुंगी हे ना.मा.प्र महिलेसाठी राखीव आहेत. त्यामुळे त्यांना ओबीसी कार्डवर लढावे लागणार आहे. मात्र, त्या कोणत्या गटातून लढणार याविषयी उत्कंठा आहे. घुलेंच्या कट्टर विरोधक समजल्या जाणार्‍या जनशक्तीच्या हर्षदा काकडे यांचीही तोडफोडी आणि नंतर आरक्षणामुळे राजकीय अडचण झाली आहे. त्यांनाही ‘ओबीसी’ कार्डवर लढावे लागणार आहे. ‘भातकुडगाव’मध्ये घुले-काकडे असा सामना पहायला मिळू शकतो, अशीही चर्चा आहे.

कर्डिलेंच्या सूनबाईंची एन्ट्री!

झेडपी निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपूत्र अक्षय कर्डिले यांची राजकीय एन्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आरक्षणात त्यांचा हक्काचा नागरदेवळे गट ना.मा.प्र महिलेसाठी राखीव झाला आहे. तर जेऊरही महिलेसाठी गेला आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना राजकीय प्रवेशासाठी आणखी काही काळ थांबावे लागेल, असे चित्र आहे. मात्र, याचवेळी अक्षय यांच्या सौभाग्यवतींना या ठिकाणी संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

The post नगर : झेडपी आरक्षणात प्रस्थापितांना धक्के! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/PVHbAQI
via IFTTT

कर्जत : प्रस्थापित मातब्बर नेत्यांना मोठा धक्का, तालुक्यात उलथापालथ

https://ift.tt/P0y2K81

गणेश जेवरे : 

कर्जत : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रस्थापित नेत्यांना निवडणुकीपूर्वीच आरक्षणामुळे धक्का बसला आहे. एकूणच तालुक्यातील जिल्हा परिषदेचे राजकारणात राजकीय भूकंप झाल्यासारखे आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात उलथापालथ झाली असून, आता सर्व मदार पंचायत समितीच्या 10 गणांवर असल्याचे दिसून येते. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर झाले.

या आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी तीन गट आरक्षित झाल्यामुळे या गटातील प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय फेरबदल होणार असल्याचे दिसून येत आहेे. तालुक्यातील पंचायत समितीच्या 10 गणाचे आरक्षण कर्ज तहसील कार्यालयात काढण्यात आले. तालुक्यातील मिरजगाव गट अनुसूचित जाती महिला, कोरेगाव गट अनुसूचित जाती व चापडगाव अनुसूचित जाती, असे आरक्षण झाले आहे. त्यामुळे या गटामधील अनेक प्रस्थापित मातब्बर नेत्यांना जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्याची संधी हुकली. तालुक्यातील मिरजगाव, कोरेगाव व चापडगाव गट प्रस्थापित नेत्यांचे होते.

या ठिकाणी आरक्षण निघाल्यामुळे तालुक्यातील राजकीय चित्र आणि समीकरण आगामी काळामध्ये बदलणार आहे. यापूर्वी तालुक्यामध्ये कधीही अशा पद्धतीने तीन जिल्हा परिषद गट एकाच वेळी आरक्षित झालेले नव्हते. निवडणुका जाहीर होणार असल्याचे पाहून अनेक इच्छुकांनी गटामध्ये गाठीभेटी घेऊन मोर्चे बांधणी केली होती. मात्र, अचानक आरक्षण निघाल्यामुळे इच्छुकांना ही मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसला आहे. सर्वात लक्षवेधी असणारा तालुक्यातील कुळधरण जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण निघाला आहे. यामुळे या गटात मोठी चुरस पाहायला मिळेल.

राष्ट्रवादीचे विद्यमान उपसभापती राजेंद्र गुंड यांचे 25 वर्षांपासून या गटावर वर्चस्व आहे. तालुक्यातील राशीन जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. यामुळे या गटातही इच्छुकांना धक्का बसला आहे. यामुळे आता अनेकांना मिस्टर ऐवजी श्रीमतीजींना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. यामुळे राशीन जिल्हा परिषद गटावर होम मिनिस्टरचे वर्चस्व राहिल.

 

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गटाचे आरक्षण निघाले आहे यामुळे अनेकांच्या निवडणुकी लढवण्याच्या अडचणी निर्माण झाले आहेत. घड्याळाच्या काट्याप्रमाणे गट रचना झाली नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्याची किंमत मोजावी लागली हे सर्व करताना अधिकार्‍यांनी काय नियम लावले, हे त्यांनाच माहिती.
– श्याम कानगुडे, राष्ट्रवादी

 

जिल्हा परिषदेचे आरक्षण धक्कादायक असून, ज्या पद्धतीने गट आणि गण रचना केली होती ती पूर्णपणे चुकीची केल्यामुळे त्याचा फटका तालुक्यातील सर्व राजकीय प्रमुख आणि मतदारांना बसला आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे गट आणि गण रचना करण्याची घोषणा असताना घड्याळाचे काटे तालुक्यात उलटे फिरले आहेत.
– काकासाहेब तापकीर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

 

The post कर्जत : प्रस्थापित मातब्बर नेत्यांना मोठा धक्का, तालुक्यात उलथापालथ appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/fo5BJXi
via IFTTT

शेवगावात पाच गण महिलांसाठी, तीन गण सर्वसाधारण

https://ift.tt/NATgq5M

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यात दहा पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीत तीन गण सर्वसाधारण, चार गण सर्वसाधारण महिला, तर प्रत्येकी एक गणात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. येथील पंचायत समिती गणांची सोडत उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार छगन वाघ, नायब तहसीलदार मयूर बेरड, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती चेलना, भरत गाट यांच्या उपस्थितीत पार पडली.

पार्थ अतुल रासने या बारा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीत पाच गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. वाघोली गण अनुसूचित जात प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. चापडगाव, मुंगी, भातकुडगाव हे तीन गण सर्वसाधारण झाले आहेत. यावेळी भाजपचे ताराचंद लोढे, भीमराज सागडे, राष्ट्रवादीचे काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, शरद सोनवणे, शिवसेनेचे शीतल पुरनाळे, सिद्धार्थ काटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, बहुजन आघाडीचे प्यारेलाल शेख आदी उपस्थित होते.

पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे दहिगाव ने – सर्वसाधारण महिला, एरंडगाव – सर्वसाधारण महिला, चापडगाव – सर्वसाधारण, मुंगी – सर्वसाधारण, बोधेगाव – सर्वसाधारण महिला, लाडजळगाव – सर्वसाधारण महिला, भातकुडगाव – सर्वसाधारण, वाघोली – अनुसूचित जाती, अमरापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आखेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग.

The post शेवगावात पाच गण महिलांसाठी, तीन गण सर्वसाधारण appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ETJ1IXh
via IFTTT

नगर : अंबिकामाता भंडार्‍यास भाविकांचा प्रतिसाद

https://ift.tt/4qj5exr

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील माताडे मळा येथील श्री अंबिका माता तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री अंबिका माता भंडारा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त देवीच्या मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले.

माताडे मळा परिसरातील देवीच्या मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरातील कुरण रोड येथे पूर्वी मंदिर होते. कालांतराने त्याचे माताडे मळा परिसरात स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी देवीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये दररोज पूजा पाठ करण्यात येतात. याशिवाय दरवर्षी भंडारा उत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीही भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील महिलांनी कलश मिरवणूक काढली होती. पूजेनंतर दिवसभर भंडार्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अंबिका माता तरुण मित्र मंडळ व पावबाकी परिसरातील श्री गुरुदत्त मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष माताडे, पोपट माताडे, विजय माताडे, दगडू माताडे, बाळासाहेब माताडेे, आकाश माताडेे, रवि माताडे, शुभम माताडे आदींनी प्रयत्न केले.

The post नगर : अंबिकामाता भंडार्‍यास भाविकांचा प्रतिसाद appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/N1yIe9X
via IFTTT

नगर : जाचकवाडीला दोन लाखांची नळ योजना

https://ift.tt/9bKxWHM

बोटा, पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पठार भागातील जाचकवाडी गावाला ‘जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल’ नुसार नळ योजनेसाठी एक कोटी सत्त्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्ता पूर्ण व सातत्याने पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात ही योजना पाणी व स्वच्छता समितीच्या पुढाकाराने राबविली जात आहे. या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आहेत.

केंद्र आणि राज्याचा निम्मा-निम्मा वाटा

ही योजना जरी केंद्राची असून यासाठी केंद्राचा 50 टक्के आणि राज्याचा 50 टक्के वाटा अशी ‘जल जीवन मिशन योजना’ सध्या अहमदनगर जिल्ह्यात राबविली जात आहे. याच योजनेतून जाचकवाडी गावाला नळ योजनेसाठी तब्बल एक कोटी सत्त्याहत्तर लाख रुपयांचा निधी मिळाल्याने गावकर्‍यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाचकवाडी ग्रामपंचायत यांचे प्रस्तावानुसार या योजनेचा सर्व्हे देखील झाला आहे. त्यास मान्यता देखील मिळाली. त्यामुळे गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेतून गावातील घरोघर नळ जोडणी करून ही ‘हर घर जल योजना’ राबविली जाणार असल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

जाचकवाडी गावाला मार्च, एप्रिल महिन्यात पिण्यासाठी पाणी कमी पडत होते. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वण- वण करावी लागत होती. या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावासाठी नळ योजनेला भरघोस निधी मिळाला आहे. या योजनेतून गावातील मळे, वस्तीवर नळ कनेक्शन देऊन बारामाही नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. या योजनेचा गावासाठी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. त्यामुळे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे ग्रामविकास अधिकारी वैभव गायकवाड यांनी सांगितले.

माझ्या गावच्या विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहत आहोत. ग्रामस्थांच्या प्रस्तावानुसार या नळ योजनेची मागणी ग्रामपंचायत माध्यमातून केली होती. ग्रामपंचायतने त्यानुसार प्रस्ताव देखील वरिष्ठ पातळीवर पाठवला होता.त्यानुसार जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचा सर्व्हे देखील झाला आणि त्यास मान्यता देखील मिळाली. या योजनेसाठी गावाला भरघोस असा निधी मिळाला असल्याने गावकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

                                                                                  – संगीता महाले, सरपंच

जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना चांगली असून गावच्या ग्रामस्थांची देखील मागणी होती. या मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतीचा माध्यमातून पाठपुरावा केला. गावकर्‍यांच्या मागणी प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली. तसेच भरघोस निधी मिळाल्याने गावातील प्रत्येक घरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने गावकरी देखील समाधान व्यक्त करत आहे.

                                                                               – योगेश महाले, उपसरपंच

The post नगर : जाचकवाडीला दोन लाखांची नळ योजना appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/M5BSkzw
via IFTTT

नगर : महाश्रमदानाने कर्जतमध्ये स्वच्छता

https://ift.tt/QREwzPW

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : कर्जत येथे सद्गुरू गोदड महाराज रथयात्रनिमित्त झालेल्या गर्दीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून घाण झाली होती. शहरातील सर्वांनी एकत्र येऊन महाश्रमदान करत शहराची स्वच्छता केली.

रथयात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली. पाऊस असूनही सलग दोन दिवस प्रचंड गर्दी होती. खाण्याचे, मनोरंजनाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामुळे खाद्यपदार्थांची घाण, हार, नारळ, प्लास्टिक, कागद, अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण शहरातील मुख्य परिसरात कचरा साचला होता. सर्वांनी एकत्र येत स्वच्छता केली. सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांनी सकाळी महाश्रमदान स्वच्छता अभियानास सुरुवात केली. यानंतर मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपंचायतचे सर्व स्वच्छता कर्मचारी, सर्व शाळांचे विद्यार्थी, तसेच अनेक मान्यवर या अभियानात सहभागी झाले. अवघ्या अडीच तासांत कर्जत शहराची संपूर्ण स्वच्छता त्यांनी केली.

यानंतर सर्व विद्यार्थी, स्वच्छतादूत हे कर्जत बसस्थानक परिसरात एकत्र आले. अभियान यशस्वी केल्याबद्दल नगरपंचायतच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पुरी सर यांनी मनोगत व्यक्त केले.

टायगर अकॅडमीचे योगदान

अभियानासाठी मिरजगाव येथून टायगर अकॅडमीचे 150 विद्यार्थी मिरजगाव ते कर्जत असे 25 किलोमीटर अंतर धावत आले. त्यांनी कर्जत शहरात मेन रोड, बाजारतळ व गोदड महाराज मंदिर परिसरात स्वच्छता केली. या अकॅडमीतील शिक्षक व सर्व विद्यार्थी या अभिनव उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

The post नगर : महाश्रमदानाने कर्जतमध्ये स्वच्छता appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/8d7HKOg
via IFTTT

नगर : जखणगाव येथील रस्ता कामाकडे नेत्यांचे दुर्लक्ष

https://ift.tt/mP8Qq2t

टाकळी खातगाव, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जखणगाव येथील उंबराचा लिंबाचा मळा भिसे वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्याचा मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या भागातील सर्वच नेत्यांना याबाबत निवेदन देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

जखणगाव येथील उंबराचा मळा लिंबाचा मळा या रस्त्यावरून पावसाळ्यात जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. लहान मुलांना शाळेत जाताना तसेच शेतकर्‍यांना शेतीमाल दूध विक्री करण्यासाठी जाताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाऊस झाल्यावर लहान मुलांना शाळेत पाठवता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या भागात जवळपास 600 च्या वर मतदान आहे. तरीसुद्धा राजकीय नेतेमंडळी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तात्यासाहेब कर्डिले, शिवाजी कर्डिले, रावसाहेब भिसे, भाऊसाहेब भिसे, बी. आर. कर्डिले, रावसाहेब कर्डिले, रामराव कर्डिले, अनिल कर्डिले, बाळासाहेब भिसे, किसन कर्डिले, सुभाष भिसे, गुलाब भिसे आदी ग्रामस्थांनी दिला आहे.

The post नगर : जखणगाव येथील रस्ता कामाकडे नेत्यांचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Zd06kev
via IFTTT

नगर : आरक्षण सोडतीने वाढली इच्छुकांची धाकधूक!

https://ift.tt/lFmy0QR

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा महिन्यांपासून वेध लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांची आरक्षण सोडत आज गुरुवार (दि. 28) निघणार आहे. दरम्यान, यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांचे आरक्षण आपल्या गट-गणात पडण्याच्या धास्तीने इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  जिल्हा परिषदेचा कार्यकाल 21 मार्च रोजी संपला आहे. त्यानंतर प्रशासकांनी कारभार हाकला. सध्या प्रशासक म्हणून सीईओ आशिष येरेकर हे कारभार पाहत आहेत. तर, दुसरीकडे इच्छुकांच्या निवडणूक आयोगाकडे नजरा लागल्या आहेत.

प्रारंभी पूर्वीच्या 73 गट आणि 146 गणांची मोडतोड करून 12 गट आणि 24 गण वाढविले. गट-गणांची अंतिम रचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. त्यात ओबीसीचा प्रश्नही मार्गी लागला. त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे अखेर निश्चित झाले. आज जिल्हा परिषदेच्या 85 गटांसाठी जिल्हाधिकारी हे नगर येथे सोडत काढतील, तर पंचायत समितीच्या 170 गणांसाठी त्या-त्या तालुक्यांत तहसीलदारांवर सोडतीची जबाबदारी दिलेेली आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. आज सकाळी इच्छुकांच्या उपस्थितीत ही सोडत काढली जाणार आहे.

दरम्यान, आरक्षण सोडत निघाल्यानंतर काहींचा हिरमोड होणार, तर काहींना सोयीचे राजकारण ठरणार, त्यामुळे या सोडतीवरच इच्छुकांची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे. काही ठिकाणी आरक्षणामुळे आपली राजकीय गैरसोय झाल्यास सौभाग्यवतींना पुढे करावे लागेल, तर काही ठिकाणी शेजारील सुरक्षित गट-गणांमध्येही दिग्गजांना चाचपणी करावी लागणार आहे.

कसे असेल संभाव्य आरक्षण..
जिल्हा परिषदेच्या 85 गटांपैकी 50 टक्केप्रमाणे 43 जागा ह्या महिलांसाठी असतील. यात, ओबीसींच्या पूर्वीच्या 20 जागांत आणखी किमान 2 ने भर पडून तो आकडा 22 पर्यंत पोहचेल. तर अनुसूचित जाती 11 आणि जमाती 8 गटांची सोडत होणार आहे. या आरक्षित जागांपैकी 50 टक्के जागा त्या-त्या प्रवर्गातील महिलांना असतील. आरक्षण सोडत काढताना लोकसंख्या आणि चक्रीय पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

आता कोणाला फटका..?
गेल्या पाच वर्षांपूर्वी आरक्षण सोडतीत तत्कालीन अध्यक्षा मंजूषा गुंड, उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मीरा चकोर या सभापतींच्या गटावर आरक्षण पडले होते. याशिवाय बाळासाहेब हराळ, अ‍ॅड. सुभाष पाटील, संभाजी दहातोंडे यांचेही गट आरक्षणाने अडचणीत सापडले होते.

माजी पदाधिकार्‍यांच्या गटांकडे नजरा
राजश्री घुले (दहिगावने), शालिनीताई विखे (लोणी), मीराताई शेटे (साकूर), अनुराधा नागवडे (बेलवंडी), शशिकला पाटील (वांबोरी), सुनीता भांगरे (राजूर), सुप्रिया झावरे (ढवळपुरी), सुवर्णा जगताप (मांडवगण), राणी लंके (सुपा), प्रभावती ढाकणे (भालगाव), काशीनाथ दाते (टाकळी ढोकेश्वर), सुनील गडाख (शिंगणापूर), प्रताप शेळके (वडगाव गुप्ता), राजेश परजणे (संवत्सर), कैलास वाकचौरे (धामणगाव), शरद नवले (बेलापूर) धनराज गाडे (बारागाव नांदूर) .

The post नगर : आरक्षण सोडतीने वाढली इच्छुकांची धाकधूक! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/hRMIJ3s
via IFTTT

कोळगाव : चोरट्यांच्या मारहाणीत वृद्ध दाम्पत्य जखमी

https://ift.tt/FBsQH9e

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे मोहोरवाडी शिवारात सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या ग्रीलचा कडीकोयंडा तोडून घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या अंगावरील 90 हजार रुपये किमतीचे दागिने नेले. पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन श्वान पथकाला पाचारण केले. एकनाथ अंतू हराळ आणि उषा एकनाथ हराळ असे चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी करत श्वानपथकाला पाचारण केले.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार तालुक्यातील कोळगाव येथील मोहोरवाडी परिसरात एकनाथ अंतू हराळ हे पत्नीसह घरात झोपले असताना सोमवार दि.25 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचा दरवाजाची कडीकोयंडा उघडून घरात प्रवेश करत त्यांची पत्नी उषा यांना मारहाण करीत यांच्या कानातील, तसेच अंगावरील दागिने ओरबाडले, या झटापटीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. एकनाथ हराळ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करीत 89 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले.

आरडाओरडा ऐकून शेजारी असणार्‍या शरद मोहारे, भूषण मोहारे, नवनाथ मोहारे, सागर बाराथे यांनी वृद्ध दाम्पत्याला कोळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एकनाथ हराळ यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी मागणी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सरपंच वर्षा काळे, उपसरपंच सारिका मोहारे, माजी उपसरपंच अमित लगड, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे, संतोष मेहत्रे, तसेच इतर ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, भर पावसाळ्यात ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्यामुळे कोळगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्वान पथकाला केले पाचारण
घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी करत श्वानपथकाला पाचारण केले. सातत्याने होणार्‍या चोर्‍या, घरफोड्या यामुळे पोलिसांच्या समोर चोरांनी आव्हान उभे केले आहे.

The post कोळगाव : चोरट्यांच्या मारहाणीत वृद्ध दाम्पत्य जखमी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/GNTA4cr
via IFTTT

सीएम शिंदे से मिलीं बाल ठाकरे की बहू स्मिता ठाकरे

महाराष्ट्र में शिवसेना विधायकों की बगावत के बाद उद्धव ठाकरे ने सत्ता गंवा दी। इस बीच उद्धव के परिवार में भी बगावत के सुर फूटने लगे हैं। बाला साहेब ठाकरे की बहू स्मिता ठाकरे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की है। https://ift.tt/EITMOp2

नगर : ..तर लोखंडेंना शिर्डीत फिरू देणार नाही

https://ift.tt/mk0NpRB
Shivsena

उंबरे, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अडचणीत आहेत. अशावेळी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याऐवजी खासदार सदाशिव लोखंडे हे त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे तमाम शिवसैनिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. खासदार लोखंडे यांनी अजूनही झालं गेलं विसरून पुन्हा यावे, अन्यथा शिवसैनिक त्यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाहीत, असा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.

पै. खेवरे म्हणाले, शिवसेनेने माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला ओळख दिली आहे. मान-सन्मान दिला आहे. त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आणि ठाकरेंसमवेत राहणार आहे. मात्र, ज्या लोखंडेंना स्थानिक विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली, शिवसैनिकांनीही आदेश पाळताना अवघ्या 17 दिवसांत जीवाचे रान करून त्यांना निवडून आणले. त्यांनी आज पक्षाचा, पक्षप्रमुखांचा आणि जनतेचाही मोठा विश्वासघात केला आहे. लोखंडे हे रहायला मुंबईत आहेत. मात्र, तरीही त्यांना जनतेने शिर्डीतून खासदार केले. असे असतानाही त्यांनी मतदारसंघात कोणतेही भरीव काम केलेले नाही, त्यातच नेत्यांशीही धोकेबाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर आता जनतेही कितपत विश्वास ठेवावा, हा प्रश्न उभा राहिला आहे.

पक्ष बदलल्यानंतर जनता माफ करत नाही, हा इतिहास आहे. अशीच चूक वाकचौरे यांनी केली होती. त्यांनाही जनतेने घरी बसवले. त्यामुळे खासदार लोखंडे यांनी पुन्हा यावे, त्यांचे स्वागतच करू, असेही खेवरे यांनी स्पष्ट केले.

.. तर खा. लोखंडेंच्या संपत्तीची चौकशी!

खासदार सदाशिव लोखंडे हे मतदारसंघात दोनवेळा खासदार झाले. त्यांनी एकाही शिवसैनिकासाठी मोठे काम केले नाही. जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी कोणतेही भरीव काम केलेले नाही. उलट, कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती जमा केली आहे. प्रसंगी याप्रकरणी चौकशी करावी, यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचेही जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी स्पष्ट केले.

उत्तरेतून चार हजार प्रतिज्ञापत्रे पाठविणार

शिवसेना आणि ठाकरे घराण्याशी मी प्रामाणिक आहे. त्यामुळे पक्ष आणि माझे पक्षप्रमुख अडचणीत असल्याने मी आणि माझे तमाम शिवसैनिक रात्रीचा दिवस करून प्रतिज्ञापत्र करत आहोत. उत्तरेतून सुमारे 4 हजार प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. आणखी दोन हजार प्रतिज्ञापत्र शेवटच्या टप्प्यात असून, तेही लवधरच दिले जातील, अशी माहिती पुढे येत आहे.

The post नगर : ..तर लोखंडेंना शिर्डीत फिरू देणार नाही appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XRLsx1q
via IFTTT

राहुरी : आषाढ सरी बरसल्या ! मुळा धरण 75 टक्क्यांकडे

https://ift.tt/RvTUBFD

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर आषाढी सरींची कृपा चांगलीच लाभदायी ठरली. धरणसाठा 75 टक्क्यांच्या समीप पोहोचला आहे. धरणामध्ये 19 हजार 129 दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली असून, आवक 2 हजार 984 क्यूसेक प्रवाहाने होत होती. मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे व हरिश्चंद्रगड पट्ट्यात पावसाचा कमी-जास्त वर्षाव सुरूच आहे.

पाणलोटातील बलठण, यसणठाव, आंबीत, कोथळा, शेळवंडी, पिंपळगाव खांडसह छोटी- मोठी धरणे व बंधारे तुडूंब होऊन वाहत आहेत. परिणामी पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला, तरीही डोंगर दर्‍यातून झिरपणारे व पावसामुळे धरणाकडे होणारी आवक सुरूच आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता धरणाचा साठा 18 हजार 770 दलघफू होता. आवक 4 हजार 24 क्यूसेक इतकी होती. दरम्यान, दुपारी 12 वाजता आवक 2 हजार 441 क्यूसेक, तर 3 वाजता 3 हजार 212 क्यूसेक नोंदविण्यात आली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी 6 वाजता धरण साठा 73 टक्के इतका झालेला आहे.

मुळा धरण बुधवारी (दि.27) 75 टक्के भरणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावरही पावसाचा वर्षाव काहीशा प्रमाणात ओसरला आहे. परंतु, आषाढी सरींच्या वर्षावाने वातावरणातील गारवा टिकलेला आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण निर्मिती झाल्याचा आनंद असताना, दुसरीकडे मुळा धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण 26 हजार दलघफू क्षमतेने भरण्यासाठी सज्ज झाल्याचे सुखद चित्र आहे. सन 1972 पासून मुळा धरण निर्मिती नंतर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला. धरण निर्मितीपासून धरण 32 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे 33 व्या वेळी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे.

लाखो हेक्टरला संजीवनी देणार्‍या मुळा धरणाचा पाणीसाठ्याचे दुष्काळमुक्तीला मोठे योगदान आहे. धरणाचा पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पावसाचा वर्षाव चांगलाच लाभदायी ठरल्याचे समाधान शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे.

..तर मुळाचे दरवाजे जुलैतच उघडणार
मुळा धरणाचा साठा 19 हजार 129 दलघफू (73 टक्के) इतका झाला आहे. 31 जुलैपर्यंत मुळा धरणसाठ्याने 20 हजार दलघफूची पाणी पातळी ओलांडल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिली आहे. मुळा धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची मोठी पर्वणी पर्यटकांना लाभण्याची दाट शक्यता आहे.

The post राहुरी : आषाढ सरी बरसल्या ! मुळा धरण 75 टक्क्यांकडे appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/5Yj3zgk
via IFTTT

नगर : 28 ग्रामपंचायतींची 29 ला आरक्षण सोडत

https://ift.tt/bNtceaI

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्‍या 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाने नव्याने जाहीर केला आहे. या आरक्षण सोडतीसाठी 29 जुलै रोजी गावागावात विशेष ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या 3 जूनच्या निर्देशांनुसार डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या प्रारुप रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार दि. 21 जून रोजी आरक्षणासहीत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.

त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, तसेच नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या विचारात घेऊन, त्यानुसार इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे. यासाठी 28 गावांमध्ये दि. 29 जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, त्यासाठी गावनिहाय अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती तहसीलदार उमेश पाटील यांनी केली आहे.

आरक्षण सोडत होणार्‍या ग्रामपंचायती व नियुक्त अधिकारी

सारोळा कासार – सी. एस. सोनार (विस्तार अधिकारी, पं. स.), कापूरवाडी – एस. एम. आंबेडकर (शाखा अभियंता, पं. स.), पिंपळगाव कौडा – सचिन चौधरी (विस्तार अधिकारी, पं. स.), दहिगाव – आशाबाई पवार (विस्तार अधिकारी, पं.स.), साकत – रवींद्र कापरे (विस्तार अधिकारी, पं. स.), नागरदेवळे – रामनाथ कराड (विस्तार अधिकारी, पं.स.), आगडगाव – निर्मला साठे (विस्तार अधिकारी, पं.स.), शेंडी – एस. पी. झाडे (मंडल अधिकारी), नांदगाव – डी. ए. जायभाय (मंडल अधिकारी), मदडगाव – बकरे (मंडल अधिकारी), सोनेवाडी (पिंपळगाव लांडगा) – व्ही. एल. गोरे (मंडल अधिकारी), टाकळी खातगाव – वृषाली करोसिया (मंडल अधिकारी), वाळकी – वैशाली साळवे (मंडल अधिकारी), रांजणी – जे. जी. ढसाळ (मंडल अधिकारी), पांगरमल – जे. जी. सुतार (मंडल अधिकारी), उक्कडगाव – श्रीमती व्ही. ए. हिरवे (मंडल अधिकारी), नेप्ती – रुपाली टेमल (मंडल अधिकारी), आठवड – रवींद्र माळी (मंडल कृषी अधिकारी), खातगाव टाकळी – सी. एन. खाडे (विस्तार अधिकारी पं. स.), पिंपळगाव लांडगा – विजयकुमार सोमवंशी (कृषी पर्यवेक्षक), राळेगण म्हसोबा – प्रकाश करपे (कृषी अधिकारी), बाबुर्डी बेंद- शंकर खाडे (कृषी पर्यवेक्षक), सारोळाबद्धी – जालिंदर गांगर्डे (कृषी पर्यवेक्षक), नारायण डोह – दत्तात्रय करंडे (कृषी पर्यवेक्षक), कौडगाव जांब – प्रतिभा राऊळ (कृषी पर्यवेक्षक), जखणगाव – संजय बोरुडे (कृषी पर्यवेक्षक), सोनेवाडी (चास) – दत्तात्रय जावळे (कृषी पर्यवेक्षक), वडगाव तांदळी – ए. ए. बन (तहसील कार्यालय). या सर्व नियुक्त अधिकार्‍यांना आरक्षण सोडतीबाबत बुधवारी (दि.27) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

 

The post नगर : 28 ग्रामपंचायतींची 29 ला आरक्षण सोडत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/l9v4870
via IFTTT

नगर : भात पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

https://ift.tt/ImWjP0O

अकोले, पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये भात हे प्रमुख पीक मानले जाते. भात शेतीवरच इथल्या आदिवासी बांधवांचा संसार आणि उदरनिर्वाह अवलंबून असतो. चालू खरीप हंगामात जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने कसेबसे उतरलेले भात रोपे नंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर धडपड सुरू असल्याचे दिसते.

आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक, तसेच भात खासराच्या छोट्या छोट्या जमिनी असलेले आहेत. कमी क्षेत्रावर गुजराण करावी लागत असल्याने अगोदरच वर्ष कसे काढायचे? हा प्रश्न निर्माण झालेला असतो. बहुसंख्य शेतकरी खरिपाची कामे आवरल्यानंतर दोन पैसे हातात पडावेत म्हणून मोलमजुरीसाठी आपली गावे सोडून काही काळासाठी स्थलांतर करीत असतात. त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे भात रोपे म्हणावी तेवढी सुदृढ आणि तजेलदार नसल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे.

अतिवृष्टीपासून भात रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकेत जास्त झालेले पाणी शेताबाहेर काढून देण्याचे नियोजन बहुसंख्य शेतकरी करत आहे. पिवळ्या पडलेल्या रोपांना वाचवण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चूळ भरणी रोपांना करावी, तसेच कॅल्शियम नायट्रेट या खताची फवारणी द्वारे मात्र द्यावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी शेतकरी वर्गाला दिलेला आहे. अतिवृष्टीमुळे पाळीव प्राण्यांची हाल होत आहेत. पावसामुळे जनावरे करण्यासाठी सोडता येत नाहीत आणि घरात मुबलक चारा उपलब्ध नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

आषाढ सरी पुन्हा सक्रीय

गत दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाणलोटात आषाढ सरी पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. काल सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 9844 दलघफू (89.17) टक्के झाला होता. तर धरणातून 3609 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 49 मिमी झाली आहे.

निळवंडेतील पाणीसाठा वाढतोय

भंडारदरातून पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 6773 दलघफू (81.40 टक्के) होता. या धरणातून प्रवरा नदीत 3305 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाने पुन्हा काहीसा जोर पकडल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. काल सकाळी कोतूळ येथील 4429 क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी 5638 क्युसेक झाला होता. रात्रीतून त्यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. धरणातील साठा 18139 दलघफू (69.76 टक्के) झाल आहे. आज हा साठा 70 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. काल धरणात 137 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दरम्यान, राहाता तालुका प्रतिनिधीने कळविले की, दारणा, गंगापूर व अन्य धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीचा विसर्ग 28930 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

पर्यटकांची गर्दी

काल रविवार सुटीचा दिवस असल्याने अकोले तालुक्यातील भंडारदरातील फुललेले सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दोन वर्षांनंतर या भागातील हॉटेल व अन्य व्यावसायिकांची दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

The post नगर : भात पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/7S0kbOM
via IFTTT

नगर : कोरडगाव हद्दीतील महावितरणचे खांब धोकादायक

https://ift.tt/Ole3Wi9

कोरडगाव, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव व जिरेवाडी येथील गावठाण हद्दीअंतर्गत महावितरणचे विजेचे खांब व वीजवाहक तारांंची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी खांब धोकादायक स्थितीत असून, तसेच वीजवाहक तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत

गावात मिरवणुका असो, अगर शेतकर्‍यांच्या कापसाच्या गाड्या असो, त्यावेळी सदर वाहनांना मोठी उंची असते. अशावेळी गावातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. तारा बांबूच्या साहाय्याने वर उचलून वाहन बाहेर काढावे लागते. खंडित वीजपुरवठ्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अनधिकृत वीजवापर, शासनाने वाटलेल्या घरगुती गिरण्यांचा लोड रोहित्रावर आल्यानंतर ग्राहकांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होतो. फ्यूज जाऊन विद्युत पुरवठा खंडित होतो.

स्थानिक वायरमनचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर संबंधित अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाहीत.
गावातील धोकादायक खांब बदलण्यासाठी चार ते पाच वर्षांपासून आणलेले लोखंडी खांब, तसेच पडल्याने मातीत गाडले गेले आहेत. त्याकडे अधिकार्‍यांचे लक्ष नाही. गावातील विजेचे खांब, वीजवाहक तारांचे काम तातडीने करावे, गावठाण डीपीच्या फ्युजा नवीन बसवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच थ्री फेज विद्युत पुरवठा रात्री बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतातील वस्त्यांना अंधारात रहावे लागते.

गेल्या पंधरा दिवसांपासून शेतातील वस्त्यांना विद्युत पुरवठा होत नसल्याने चोरांचा सुळसुळाट झाला आहे, तसेच सर्पदंशांच्या घटना वाढल्या आहेत. जिरेवाडी येथील थ्री फेज रात्री चालू ठेवण्याची मागणी भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत हद्दीत नवीन कामांचे नियोजन नाही. मेन्टेनन्समधून शक्य असणारी कामे होतील. रात्री शेतीपंपांचा थ्री फेज विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश उच्च पातळीवरून असल्याने वस्त्यांची वीज बंद राहते.

                                                            – प्रिया मुंढे, सहायक अभियंता, महावितरण.

The post नगर : कोरडगाव हद्दीतील महावितरणचे खांब धोकादायक appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/3FP0B9v
via IFTTT

नगर : जखमी काळविटावर पाथर्डीत उपचार

https://ift.tt/0WK65pu

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळविटावर मोहजदवढे ग्रामस्थांनी उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले. वन्य प्राण्याचा शिकारीसाठी शिकार्‍याने लावलेले जाळे तोडून काळवीट लोकवस्तीमध्ये आले. तेथे कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. जखमी काळविटाला ग्रामस्थ भाऊराव रुपनर, अप्पा रुपनर, माउली रुपनर, योगेश रुपनर, गोवर्धन रुपनर यांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले.

काळविटावर उपचार करण्यात आले आहेत. मोहोज देवढे, रुपनरवाडी, हाकेवाडी, काळेवाडी व बहीरवाडी या चार वाड्यांच्या कार्यक्षेत्रात वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. डोंगराळ भाग असल्याने काही शिकारी डोंगरपरिसरात जोळे लावून काळवीट व हरणाची शिकार करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना माहिती देऊनही ते शिकार्‍यांवर कारवाई करीत नाहीत, असा आरोप माजी सरपंच गणेश चितळकर व ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, तालुक्यात हरणांची संख्या वाढली असून, डोंगरदर्‍यात हरणांचे कळप धावताना दिसत आहेत. या हरणांची शिकार करण्यासाठी काही शिकारी त्यांच्यामागे धावताना दिसत आहेत. त्यांचा वन खात्याने बंदोबस्त करण्याची गरज आहे.

..तर वन्यजीव संपायला वेळ लागणार नाही

या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहे. त्यात हरीण, काळवीट, ससे, कोल्हे, लांडगे यांचा समावेश आहे. दीड वर्षापूर्वी हरणाची शिकार करणार्‍या शिकार्‍यांचे सामान वन विभागाने जप्त केले होते. या भागात मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. वन विभागांने याचा बंदोबस्त केला पाहिजे, अन्यथा वन्यजीव संपायला वेळ लागणार नाही.

The post नगर : जखमी काळविटावर पाथर्डीत उपचार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/897EXqG
via IFTTT

पीकविम्याकडे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ! नगर जिल्ह्यात 12 लाख खातेदार

https://ift.tt/7bH6u4s

नगर; पुढारी वृत्तसेवा: विमा कंपन्यांच्या काही जाचक अटींंमुळे नुकसान होऊनही शेतकर्‍यांना भरपाईसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकर्‍यांसाठी जणू मृगजळ ठरत आहे. यावर्षीही शेतकर्‍यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र असून, काल सोमवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 12 लाख खातेदार असतानाही, केवळ 58 हजार शेतकर्‍यांनीच आपल्या पिकांचा विमा काढल्याचे उदासीन चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये राबविण्यास कृषी विभागाने 1 जुलै रोजी मान्यता दिली. त्यानुसार जिल्ह्यात पीकविमा नोंदणीला सुरुवात झाली.

पीकविमा काढण्यासाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीवर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी ती ‘आयसीआयसी’कडे होती. आता कंपनीत बदल करण्यात आला आहे. मात्र, पीकविमा ही चांगली योजना असली, तरी विमा काढल्यानंतरही नुकसानीची भरपाई जाचक अटींमुळे काही भागात मिळत नसल्याचे पुढे आले आहे. पीकविमा कंपन्यांनी अतिवृष्टीची दिलेली व्याख्या, सलग पाच दिवस किंवा तत्सम कालावधीत मंडलात ‘तितका’ पाऊस पडला, तरच विम्यासाठी पात्र ठरविण्याची अट, त्यात पीक कापणी प्रयोग, आणेवारी काढण्याची प्रक्रियाही काही भागांसाठी अडचणीची ठरत आहे.

त्यामुळेच पदरमोड करूनही पीकविम्याचे हप्ते भरले, तरीही पीकविमा कंपन्या आणि त्यांच्या जाचक अटींमुळे शेतकर्‍यांना भरपाई मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांचा पीकविम्यावरील विश्वास संपू लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्यात 12 लाख 86 हजार खातेदार असताना सोमवारपर्यंत केवळ 58 हजार 326 शेतकर्‍यांनीच विम्यातून नोंदणी केली आहे. गतवर्षी काढलेल्या विम्याच्या भरपाईपासून बहुतांश शेतकरी अद्याप वंचित असल्याने हा परिणाम दिसत असल्याचे शेतकर्‍यांमधून चर्चा आहे.

पीकविमा योजनेत सहभाग नोंदवा : जगताप
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान यासह पीक कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादन कमी आल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जाते. 31 जुलै ही पीकविमा उतरविण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप आणि एचडीएफसीचे रामदास फुंडे यांनी केले आहे.

शेवटचे पाच दिवस; शेतकरी निरुत्साहीच !
पीक विमा नोंदणीसाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. नोंदणीला 20 दिवसांवर कालावधी उलटून गेला असून, अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आता, तर पीकविमा नोंदणीत सहभागी होण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना बहुतांश शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

The post पीकविम्याकडे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ! नगर जिल्ह्यात 12 लाख खातेदार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ZzB5bpV
via IFTTT

नगर जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकाने होणार आयएसओ; राज्य शासनाचा संकल्प

https://ift.tt/kLOfV3S

नगर; पुढारी वृत्तसेवा: गोरगरीब जनतेला धान्य वाटप करणार्‍या स्वस्तधान्य दुकानांचे रुपडे बदलणार आहे. या दुकानांना आता आयएसओ दर्जा मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाची धावपळ सुरू आहे. राज्याच्या पुरवठा विभागाच्या वतीने गोरगरीब जनतेला रेशनकार्डवर दरमहा अत्यल्प दराने स्वस्तधान्य दुकानांतून धान्य, तांदूळ व साखर वितरित केले जात आहे. दोन दशकांपूर्वी रेशनकार्डवर ओळख न पटविता धान्य दिले जात होते. धान्य वाटप कधी सुरू होते आणि कधी बंद होत असे, याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे या स्वस्तधान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे येत असे. परंतु पुराव्याअभावी कोणावर सहसा कारवाई होत नव्हती.

गेल्या काही वर्षांपासून जगभरात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. या तंत्रज्ञानाचा फायदा घेत सरकारने व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले. त्यानंतर स्वस्तधान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक स्वस्तधान्य दुकानांत पॉस मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनव्दारे लाभार्थ्यांची ओळख पटणे आता सोपे झाले. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळत आहे. याशिवाय दुकानात वाटपाअभावी किती धान्य उपलब्ध आहे. याची माहिती राज्य सरकारला उपलब्ध होऊ लागली आहे. मध्यंतरी राज्य शासनाने रेशनकार्डला आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाभरात आधारजोडणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजमितीस 99 टक्के रेशनकार्डधारकांची आधार जोडणी झालेली आहे.

या जोडणीमुळे रेशनकार्डधारला दुबार व इतरत्र धान्य उचलता येणार नाही. राज्य पुरवठा विभागाने आता गावागावांतील स्वस्तधान्य दुकाने हायफाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीस आता आयएसओ दर्जा देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. तालुकाहस्तरीय पुरवठा विभाग, तालुकास्तरीय गोदाम व स्वस्तधान्य दुकान या तीनस्तरावर आयएसओचे कामकाज सुरू असल्याचा निर्वाळा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 884 स्वस्तधान्य दुकाने आहेत.या दुकानांना आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी आता प्रत्येक दुकानदाराना ड्रेसकोड तसेच ओळखपत्र उपलब्ध होणार आहे.

याशिवाय दुकानांचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. दुकानात अद्ययावत नोंदवही, विविध प्रकारचे रजिस्टर आदी उपलब्ध होणार आहे. दुकानांची स्वच्छता आणि टापटीपपणा कायम ठेवला जाणार आहे. लाभार्थ्यांसाठी या दुकानांत बैठक व्यवस्था असणार आहे. दुकानात उंदीर व घशींचा सुळसुळाट असल्याने, धान्याची नासाडी होते. हा प्रकार रोखण्यासाठी आता दुकानात पिंजरा देखील ठेवला जाणार आहे. सर्वच स्वस्तधान्य दुकानांना एकच रंग असणार आहे. त्यामुळे आता सर्व दुकाने हायफाय दिसणार आहेत.

आयएसओसाठी कामाला लागा
जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी नुकतीच तालुकास्तरीय पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी स्वस्तधान्य दुकानदारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती कामगिरी करण्यासाठी प्रत्येकानी पुढाकार घ्यावा अशा सूचना यावेळी करण्यात आली.

The post नगर जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकाने होणार आयएसओ; राज्य शासनाचा संकल्प appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/GTPxVh1
via IFTTT

नगर : जिल्हा परिषद पंचायत समिती गट, गणांची गुरुवारी आरक्षण सोडत

https://ift.tt/eEi9QbZ

नगर; पुढारी वृत्तसेवा: ओबीसी आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची तर प्रत्येक तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. मात्र, यंदा ओबीसी प्रवर्गाच्या जागा घटण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता. त्यानुसार गट व गणांची अंतिम रचना 7 जूनलाच जाहीर झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने त्यानंतर 13 जुलै रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने 12 जुलै रोजी आरक्षण सोडत कार्यक्रमाला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा नुकताच ओबीसी अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला.

गुरुवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरु सभागृहात जिल्हा परिषद गटांची तर पंचायत समित्यांच्या 170 गणांची त्या-त्या तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षणाची प्रारुप यादी 29 जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार असून, या यादीवर 2 ऑगस्ट 2022 पर्यत हरकती मागविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे 11 व जमातीचे 8 गट , तर चौदा पंचायत समित्यांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे 22 व जमातीचे 16 गण निश्चित असून, सोडतीव्दारे ते कोणत्या गटात व गणांसाठी असणार याबाबत गुरुवारी फैसला होणार आहे.

ओबीसींसाठी 22 गट, 39 गण?
जिल्हा परिषदेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाला 19 जागा उपलब्ध झाल्या होत्या. यंदा गटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ओबीसीसाठी 23 गट राखीव राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नवीन नियमानुसार ओबीसीसाठी 22 गट तर पंचायत समित्यांमध्ये अंदाजे 35 ते 39 गण राखीव असण्याची शक्यता आहे.

The post नगर : जिल्हा परिषद पंचायत समिती गट, गणांची गुरुवारी आरक्षण सोडत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/W4JoiFq
via IFTTT

नगर : पाच दिवसांत 24 हजार जणांनी घेतला बुस्टर

https://ift.tt/7X6bvGf
COVID-19 Booster Dose

नगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना देखील बुस्टरचा डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर आता गर्दी वाढू लागली आहे. गेल्या पाच दिवसांत 24 हजार 96 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

कोरोना संसर्गाने दोन वर्षात सर्वच जनजीवन विस्कळीत केले. पहिली आणि दुसरी लाट जीवघेणी ठरली. या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेतली. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील 18 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील 30 लाख 82 हजार 823 नागरिकांनी पहिला तर 24 लाख 46 हजार 476 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 68 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी बुस्टर डोस घेणे अनिवार्य आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असणार्‍या तसेच फ्रंटलाईनवर्कर, आरोग्य कर्मचारी यांना मोफत बुस्टर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. उर्वरित 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी खासगी रुग्णालयांत बुस्टर डोस उपलब्ध केला. मात्र, यासाठी या नागरिकांना पावणेचारशे ते चारशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे विकतचा बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळू लागला. 14 जुलैपर्यंत 18 ते 59 वयोगटातील फक्त 983 नागरिकांनी पैसे मोजून बुस्टर डोस घेतला.

केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर 75 दिवस बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला. 15 जुलैपासून ही मोहीम सुरु झाली. त्यामुळे आता जिल्ह्यामधील 435 लसीकरण केंद्रांवर मोफतचा बुस्टर डोस घेण्यासाठी लाभार्थी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. दि. 14 जुलैपर्यंत 18 ते 45 वयोगटातील 805 तर 45 ते 59 वयोगटातील 178 नागरिकांनी पैसे अदा करुन बुस्टर डोस घेतला होता. आतापर्यंत एकूण 89 हजार 515 नागरिकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतला होता.

1 लाख 22 हजार बुस्टरधारक

मोफतचा निर्णय होताच शुक्रवारपर्यंत (दि.21) तब्बल 24 हजार 96 नागरिकांनी मोफत बुस्टर डोस घेतला आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 22 हजार 679 नागरिकांनी बुस्टर घेतला. आतापर्यंत फक्त 3.4 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोस मोफत उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

The post नगर : पाच दिवसांत 24 हजार जणांनी घेतला बुस्टर appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/u7xOIgh
via IFTTT

नगर : गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार

https://ift.tt/gJcfLyi

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करून अश्लिल छायाचित्रे सोशल मीडियावर टाकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात सचिन मोहन सारुक (रा. येळी, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर दीड महिन्यापूर्वी आरोपीची या महिलेची ओळख झाली. त्यानंतर एकमेकांच्या मोबाईल क्रमांकांचे आदान-प्रदान झाले. हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली. दि. 6 जुलै 2022 रोजी दोघे पाथर्डीमध्ये एकत्र भेटले. तेथून दोघे जेवायला एका हॉटेलमधे गेले. तेथे त्याने महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर महिलेला गुंगी आली. आराम करण्यास सांगत आरोपीने तिला हॉटेलमधील लॉजच्या रूममध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिची अश्लिल छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केली.

अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून आरोपी सारुक पसार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण करीत आहेत.

The post नगर : गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NHW682p
via IFTTT

नगर : श्रीरामपुरात डाकसेवकांचे धरणे आंदोलन

https://ift.tt/NJ1KWgn

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या भारतीय डाक विभागात कार्यरत अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर डाक कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी डाकसेवकांच्या वतीने श्रीरामपूर अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने सातवा वेतन आयोग लागू करताना डाक सेवकांच्या काही मागण्या मान्य केल्या. परंतु कमलेश चंद्रा समितीने केलेल्या शिफारशींप्रमाणे बर्‍याच मागण्या लागू करण्याच्या राहिल्या आहेत. यामध्ये ग्रामीण डाकसेवक यांना खात्यात समाविष्ट करावे, 12:24:36 याप्रमाणे जुन्या कर्मचार्‍यांना पदोन्नती द्यावी, ग्रॅज्युइटी रक्कम पाच लाख मिळावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, 180 दिवस रजा रोखीकरण करून रक्कम देण्यात यावी, कमिशन बेसवरील कामाचे मूल्यमापन करून सदर कामकाज वर्कलोडमध्ये धरावे, डाकसेवेचे खासगीकरण करू नये व ते थांबवावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी एम. एम. गडगे, बी. आर. राऊत, ए. डी. पटारे, एन. पी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर पगारे, ज्ञानदेव मोरे, अप्पासाहेब पटारे, बाबासाहेब बनकर, संतोष सोमवंशी, बंडू शिंदे, दिलीप शिंदे, रोहिणी काळे, प्रतीक्षा ओहोळ, गणेश माने, आकाश शिंदे, अमरीन सय्यद आदी उपस्थित होते.

The post नगर : श्रीरामपुरात डाकसेवकांचे धरणे आंदोलन appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/5t1KdLI
via IFTTT

नगर : कृषीच्या विद्यार्थ्यांनी बनविले ‘शीतकक्ष’

https://ift.tt/y04xnOX

संगमनेर विशेष, पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी आपल्या शेतात पिकविलेला शेतमाल, भाजीपाला जास्त काळ टिकावा, यासाठी लोणीच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शून्य ऊर्जेवर आधारित सहजपणे उपलब्ध होईल, असे साहित्य वापरून शीतकक्ष बनवून रहिमपूर परिसरातील शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या लोणी तालुका राहाता येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी, जागरूकता कार्यानुभव व औद्योगिकता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रहिमपूर तालुका संगमनेर येथील शेतकर्‍यांना शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करून दाखवला, तसेच शेतकर्‍यांच्या शंकेचे निराकरण करून कृषिदूत विशाल हगारे, कुणाल चाटे, शिवम कानवडे, प्रतीक बुर्‍हाडे, संदेश यादव, रोहित गुळवे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकरी अरुण शिंदे, चंद्रकांत वाळुंज, सुरेश खुळे, हौशिराम गुळवे, भाऊसाहेब शिंदे, सजन शिंदे उपस्थित होते. भाजीपाला व फळे नाशवंत असल्यामुळे आपण ती जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे या शीतकक्षाचा वापर करून शेतकरी फळे व भाजीपाला काही काळासाठी साठवण करू शकतात. फळे, भाजीपाला व इतर नाशवंत पदार्थांची नासाडी टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी या विद्यार्थ्यांना लोकनेते, डॉ. बाळासाहेब विखे पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. साळोखे, प्रा. अमोल खडके, प्रा. रमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

The post नगर : कृषीच्या विद्यार्थ्यांनी बनविले ‘शीतकक्ष’ appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/xpbVSJn
via IFTTT

नगर : पालिका निवडणुकांमुळे संगमनेरमध्ये ‘एसटीपी’ला विरोध

https://ift.tt/w9ezOxU

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : शहरात होऊ घातलेल्या एसटीपी प्लांटमुळे नाटकी नाल्याच्या परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छता हटणार आहे. आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. ‘एसटीपी’ला होत असलेला विरोध नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे. आ. थोरात यांचे नेतृत्व सर्वांना सोबत घेणारे आहे. विकासात त्यांनी कधीही राजकारण केले नाही, असे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

डॉ. तांबे म्हणाले, आ. थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन संगमनेरच्या विकासाला गती दिलेली आहे. त्यांनी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे संगमनेर शहराच्या पुढील 50 वर्षांच्या पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे शहराला मुबलक पाणी मिळाले आणि पाण्याचा वापरही वाढला. अशा परिस्थितीत सांडपाणी देखील वाढले. प्रवरा नदीपात्रात हे सांडपाणी जाऊ लागल्यामुळे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले. राज्याच्या आणि केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या बाबतीत संगमनेर नगरपालिकेला वारंवार नोटिसा आल्या. नगरपालिका प्रशासनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांट उभा करण्याच्या कडक सूचना दिल्या.

डॉ. तांबे पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी सांडपाणी वाहून येते त्याच ठिकाणी एसटीपी प्लांट असतो, प्रशासनाकडून नाटकी नाल्याशेजारील यंग नॅशनल ग्राउंडच्या जागेवर एसटीपी प्लांट उभारण्याचा प्रस्ताव केला. वर्षानुवर्षे नाटकी नाल्याच्या परिसरात सांडपाणी वाहून येत होते. प्रशासनाला इतरही अनेक जागा शोधायला लावल्या, परंतु जागा उपलब्ध नव्हती आणि सदर जागा नगरपालिकेच्या मालकीची होती, त्यामुळे प्रशासनाने ही जागा नक्की केली. सुरुवातीला या भागातील बहुतांश तरुणांनी यंग नॅशनल ग्राउंड वाचवण्याची विनंती केली, आ. थोरात यांनी या मैदानाला विविध निधीतून कंपाउंंड, स्टेज, तालीम करून दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन झाले, त्यामुळे प्रशासनाने तज्ज्ञांशी चर्चा करून मैदान वाचविले.

‘संवाद आणि चर्चा करूनच हे ठरविले जात होते. मात्र, संगमनेरचा विकास डोळ्यात खुपणार्‍या काही मंडळींनी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणात उडी घेतली. नागरिकांच्या मनात गैरसमज पसरविला, अनेक खोट्या आणि अशास्त्रीय गोष्टी सांगून नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली.

‘त्यांच्या’ प्रश्नामुळे साडेपाच कोटींचा दंड

मार्च महिन्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात 11 मार्च रोजी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर शहरातून होणार्‍या प्रदूषणाचा प्रश्न जाणीवपूर्वक विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संगमनेर नगरपालिकेला 5.40 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आणि एसटीपी मुदतीत न उभारल्यास दर महिन्याला 30 लाख रु. अतिरिक्त दंड ठोठावला आहे, हे देखील लक्षात घ्या, असेही डॉ. तांबे म्हणाले.

आ. थोरातच मदतीला धावून येतात

संगमनेर शहराच्या विकासासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनी कायम राजकारण बाजूला ठेवून काम केलेले आहे. राजकारण आणि जातीधर्माच्या पलीकडे जाऊन, आ. बाळासाहेब थोरात कायम सर्वांच्या मदतीला धाऊन आलेले आहेत. आता देखील संबंधितांनी या प्रश्नाबाबत आ. थोरात यांच्याकडे चर्चा करण्यासाठी पुढे यावे. याबाबत वेळप्रसंगी प्रदूषण नियंत्रण मंडळाशीही चर्चा करता येईल. मात्र, नागरिकांनी बाह्यशक्ती आणि त्यांना मदत करणार्‍यांना ओळखावे आणि कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे डॉ. तांबेंनी सांगितले.

The post नगर : पालिका निवडणुकांमुळे संगमनेरमध्ये ‘एसटीपी’ला विरोध appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/xhbH4t3
via IFTTT