नगर : 121 कोटींच्या 81 योजनांना मान्यता!

July 31, 2022 0 Comments

https://ift.tt/mRPfvKU

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून 2024 पर्यंत 1005 गावांकरिता स्वतंत्र पाणी योजना उभारण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. यामध्ये 481 योजनांची कामे प्रगतिपथावर असून, नुकतीच 121 कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या नवीन 81 कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दरम्यान, या कामांच्याही निविदा आणि वर्कऑर्डर लवकर करण्यासाठी जिल्हा परिषदेतून मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे.

नगर जिल्हा हा विस्ताराने सर्वाधिक मोठा आहे. येथील अनेक गावे आजही हंडाभर पाण्यासाठी वणवण करत असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने जलजीवन मिशन योजना हाती घेऊन, त्यातून 1005 पेक्षा अधिक गावांसाठी 900 योजनांचा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांनी जलजीवन मिशन योजनेला गती दिली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 481 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यामधील 287 कामांच्या निविदा आणि त्यानंतर वर्कऑर्डरही झाल्या आहेत. ही कामे आज प्रगतिपथावर असून, उर्वरित कामेही निविदा स्तरावर असल्याने, ती देखील लवकरच सुरू होणार असल्याचे समजले. पूर्वीची कामे वेगात सुरू असताना, आता नव्याने 81 कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या योजनांसाठी 121 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतून मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर हे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जातीने लक्ष देऊन आहेत. त्यामुळे योजना गती घेताना दिसत आहे.

कोणकोणत्या पाणी योजनांना मंजुरी

नगर ः देवगाव, चास, उक्कडगाव, निंबळक. अकोले ः बारी, लहीत बु., सावरकुटे, शेंडी, साकीरवाडी, सांगवी, मुतखेल, भोलेवाडी, शिंगणवाडी, आंबेवंगण, साम्रद, बोरी. नेवासा ः लेकुरवाळी आखाडा, नागापूर. संगमनेर ः जांभुळवाडी, निमगाव टेंभी, वनकुटे, घारगाव, गोडसेवाडी, शिबलापूर, जांबुद खु., कनकापूर, खराडी. जामखेड ः जवळके, गिरवली, आपटी, लोणी, दौंडाचीवाडी, जायभायवाडी, पाटोदा, पाडळी, धामणगाव, रत्नापृूर, मतेवाडी. कर्जत ः मानेवाडी, नांदगाव, सीतपूर, रुईगव्हण, धोंदेवाडी, घुमरी, नागलवाडी, तळवडी, डोंबाळवाडी, डिकसल, बेर्डी, देशमुखवाडी, चिंचोली काळदात, नेटकेवाडी, मलठण, करभानवाडी, चखालेवाडी, भोसे, हिंगणगाव, बहिरोबावाडी, वायसेवाडी, देऊळवाडी, राक्षसवाडी खुर्द. पारनेर ः सांगवी सूर्या, घाणेगाव, हंगा, ढोकी, गुणोरे, गतेवाडी, शेतीकासारे, रेनवडी, तिखोल, पिंपळनेर, जातेगाव, म्हसे खुर्द. श्रीगोंदा ः सारोळा. राहाता ः गोगलगाव. कोपरगाव ः संवत्सर. राहुरी ः केसापूर. शेवगाव ः कर्‍हेटाकळी.

 

The post नगर : 121 कोटींच्या 81 योजनांना मान्यता! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/PzEoyhK
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: