यवतमाळ जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभागावर शिक्कामोर्तब ; गटांची संख्या ६१ वरून, ६९वर पोहोचली

June 03, 2022 0 Comments

जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना प्रारूप प्रभाग रचना कधी जाहीर होते याकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभागांवर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ गट होते. त्यात आता आठ गटांची भर पडल्याने ही संख्यात ६९ वर पाहोचली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक ज्या विभागात घेण्यात येईल, त्या विभागाची संख्या, त्याची व्याप्ती निश्चिकत करण्यात आली आहे. गटाच्या प्रभागावर शिक्कामोर्तब झाले असले तरी यावर काही हरकती असल्यास त्या देखील विचारात घेण्यात येणार आहे. निवडणूक आयुक्तांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम पाच)चे कलम १२, पोटकलम अन्वये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक होणाऱ्या विभागाची संख्या व व्याप्ती निश्चिपत केली आहे.
नव्याने रचना करण्यात आलेल्या गटांनुसार आता बाभूळगाव तालुक्यात फाळेगाव, गणोरी, सावर, कोठा, कळंब तालुक्यात नांझा, डोंगरखर्डा, राळेगाव तालुक्यात जळका, खैरी, झाडगाव, मारेगाव तालुक्यात कुंभा, वेगाव, वणी तालुक्यात राजूर, वेल्हाळा, तरोडा, वागदरा, शिरपूर, झरी तालुक्यात माथार्जुन, मुकुटबन, पाटण, केळापूर तालुक्यात मोहदा, सायखेडा, पहापळ, पाटणबोरी, घाटंजी तालुक्यात खापरी, शिरोली, पार्डी नस्करी, पारवा, यवतमाळ तालुक्यात भारी, आकपुरी, अकोलाबाजार, रुई, नेर तालुक्यात पाथ्रटगोळे, मांगलादेवी, बाणगाव, दारव्हा तालुक्यात बोरी (खु.), लाडखेड, लोही, भांडेगाव, महागाव (कसबा), आर्णी तालुक्यात जवळा, बोरगाव (दा.), सुकळी, सावळी सदोबा, दिग्रस तालुक्यात आरंभी, कलगाव, तुपटाकळी, हरसूल, पुसद जांबबाजार, बान्सी, मधुकरनगर, बोरगडी, श्रीरामपूर, रोहडा, शेंबाळपिंपरी, शिळोणा, महागाव तालुक्यात काळी (दौलत), माकळीन्ही, हिवरा, गुंज, सवना, फुलसावंगी, उमरखेड तालुक्यात निंगनूर, खरबी, ब्राम्हणगाव, कृष्णापूर, पोफाळी, मुळावा, विडूळ या प्रमाणे गटांचा प्रभाग प्रारूप आराखडा आहे. यात निवडणूक विभागात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे, ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविस्ट असलेले क्षेत्र (गावे, वस्त्या, तांडे) समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आदेशाच्या मसुद्यात नागरिकांच्या काही हरकती असल्यास त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे ८ जूनपूर्वी किंवा त्यापूर्वी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ift.tt/VgHdvsr

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: