ईडी कारवाई करणार हे अगोदरच कसं कळतं? खुद्द किरीट सोमय्या यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…

May 27, 2022 0 Comments

शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानवर ईडीने छापा टाकल्यानंतर राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेकडून भाजपावर टीकेचे आसूड ओढण्यात येत आहेत. तर भाजपाकडूनही शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जात आहे. याआधीही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांमागे ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. यातील अनेक नेत्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अगोदर आरोप केलेले आहेत. नंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याच कारणामुळे ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची माहिती सोमय्या यांना सर्वप्रथम कशी मिळते, असा प्रश्न नेमही विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द किरीट सोमय्या यांनीच दिले आहे.

हेही वाचा >>> आधी राऊत म्हणाले आमच्याकडेही पुरावे आहेत; आता सोमय्यांचा पलटवार, म्हणाले “बोलती बंद झाली, ते…”

“जेव्हा तक्रार दाखल करण्यात येते तेव्हा सुनावणीदरम्यान कमिटमेंट मिळते. मी या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घातलेलं असतं. त्यामुळे मला हे लगेच समजू शकतं. दापोली कोर्टात अनिल परब यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार नीट वाचली तर लक्षात येतं की या तक्रारीत बनावट कागदपत्रे, फसवणूक असं भारत सरकारने लिहिलेलं आहे. आयकर विभगाची धाड पडली. सदानंद कदम यांच्या ऑडिटरने लिखित स्वरुपात जबाब दिला की सात कोटी रुपये सदानंद कदम यांच्या अकाऊंटमधून गेले आहेत. मात्र अनिल परब यांनी चौकशीत शून्य रुपये गेल्याचे सांगितले. त्यामुळे अनिल परब यांना तुरुंगात जावं लागेल, हे स्पष्ट आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

हेही वाचा >>> अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्या यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “त्यांनी कपड्यांची बॅग…”

तसेच ईडी आणि आयकर विभागाची कारवाई अगोदर कशी समजते या प्रश्नाचे उत्तर देताना, “ईडी असेल आयकर विभाग असेल यांचा मी पाठवुरावा करतो. तुरुंगात जावं लागतंय हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कोण अगोदर सांगतंय कोण नंतर सांगतंय याबद्दल काही देणघेणं नाही. ज्यांनी महाराष्ट्राला लुटलं ते तुरुंगात जात आहेत, याचा महाराष्ट्रातील जनतेला आनंद आहे,” असे स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांनी दिले.

https://ift.tt/dVQz2lX

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: