‘…तर राजीनामा देऊन जनतेला सामोरं जावं’, विट्यात सेना-राष्ट्रवादीचा वाद चव्हाट्यावर

May 09, 2022 0 Comments

कृष्णा खोरे लवादाच्या वाटपातील अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळणार आणि त्यातून टेंभू योजनेच्या ६ व्या ‘अ’ आणि ‘ब’ टप्प्याला पाणी देणार, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या आठवड्यात सांगलीत जाहीर केलं होतं. या घोषणेनंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादावरून कुरबुरीला सुरुवात झाली आहे. यानंतर आता हा वाद वाढत जाऊन चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडताना विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते अ‍ॅड. वैभव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, “स्वत:च्या ताकदीचा इतका अहंकार असेल, तर आमदारकीचा राजीनामा देऊन जनतेला सामोरं जावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी एक आदेश दिला तर खानापूर-आटपाडीचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असंही ते यावेळी म्हणाले.

पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अ‍ॅड. पाटील म्हणाले, “कुणाला कमी लेखू नका. तुम्हाला एवढंच जर वाटत असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि जनतेला सामोरं जावून दाखवा. आम्ही किंवा आमच्यापैकी कुणालाही राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली, तर शंभर टक्के या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून येईल, असंही ते म्हणाले.

खरंतर, कृष्णा खोरे लवादाच्या वाटपातील अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळणार आणि त्यातून टेंभू योजनेच्या ६ व्या ‘अ’ आणि ‘ब’ टप्प्याला पाणी देणार, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या आठवड्यात सांगलीत जाहीर केलं होतं. यावरून आता खानापूर मतदारसंघात श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं आहे. तुम्हाला सहाव्या टप्प्यातील गावं आणि भिजणारं क्षेत्र तरी माहीत आहे का? असा सवाल शिवसेनेचे आमदार बाबर यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना विचारला होता. शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीनं ढवळाढवळ करू नये, असंही त्यांनी सुनावलं होतं.

यावर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. पाटील म्हणाले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर मतदारसंघातील वंचित गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार मांडला. त्यानंतर टेंभू च्या ६ ‘अ’ आणि ६ ‘ब’ या टप्प्यांना मंजुरी मिळाली. याबद्दल आम्ही आनंद साजरा केला, पेढे वाटले, फटाके फोडले तर तुमच्या पोटात का दुखले? हे खानापूरच्या जनतेला समजलं नाही, असंही त्यांनी विचारलं.

https://ift.tt/luQA1Ft

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: